राशिभविष्य २७ सप्टेंबर, २०२१; ‘या’ राशीच्या लोकांनी विवाहाविषयी पटकन निर्णय घेण्याच्या नादात चूक करू नये. अन्यथा भविष्यात पश्चाताप सहन करावा लागू शकतो.

  मेष (Aries):

  सोमवारचा दिवस तुम्ही विसरू शकणार नाही. चतुराईनं यशापर्यंत पोहोचावं लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आजचा दिवस प्रॉपर्टी डीलरसाठी अधिक फायदेशीर ठरेल. तुम्ही बिझनेस ट्रीपवर जाऊ शकता. कोणताही मोठा निर्णय घेताना विचार करून त्याला अंतिम करा.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  वृषभ (Taurus):

  भाग्य साथ देईल. कामाच्या ठिकाणी आपलं कौतुक होईल. सोमवारी मूड खूप चांगला असणार आहे. गरजूंना मदत केल्याने समाधान मिळेल. आत्मविश्वास अधिक वाढेल. सहकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. पत्नीसोबत खरेदीसाठी गेल्यास अतिरिक्त खर्च करणं टाळा.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मिथुन (Gemini):

  दिवस खूप चांगला जाणार आहे. संघर्षाचा समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कुटुंबाची साथ मिळेल. हिम्मत सोडू नका. तुमच्या मेहनतीमध्ये वाढ होईल. जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमचा सन्मान होईल आणि ख्याती वाढेल. व्यापाराचा विस्तार होऊ शकतो.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कर्क (Cancer):

  स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. विवाहाविषयी पटकन निर्णय घेण्याच्या नादात चूक करू नका. ऑटोमोबाईलशी संबंधित लोकांना याचा फायदा होईल. सर्वसाधारणपणे पैसे मिळू शकतात.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  सिंह (Leo):

  कामाच्या ठिकाणी समस्या सुटतील. कामाचे चांगले रिटर्न्स मिळतील. आरोग्य चांगलं राहील. तुम्ही दिलेला सल्ला इतरांच्या कामी येईल. जवळच्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमची मेहनत रंग भरेल. आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कन्या (Virgo):

  ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होईल. शत्रूंना तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका. भाग्य साथ देईल मात्र सावध राहा. कामाच्या ठिकाणी स्वतःच्या अपेक्षा पू्र्ण करण्याचा दिवस आहे. आपल्या लक्ष्यला प्राधान्य दे. आर्थिक लाभासाठी चांगल्या संधी मिळतील.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  तूळ (Libra):

  सोमवारचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. भाग्य साथ देईल. कामाचा उत्साह असेल. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील. प्रियकरासोबत थोडा अबोला निर्माण होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या बर्‍याच अडचणी सुटण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  वृश्चिक (Scorpio):

  मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. हाती घेतलेलं काम मार्गी लागेल. तुम्ही विचारपूर्वक ठरवलेली सर्व कार्य पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. आक्रमकता वाढेल.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  धनु (Sagittarius) :

  कामात योग्य ते प्रयत्न यशस्वी होतील. भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित होतील. कामाच्या ठिकाणी चांगलं फळ मिळणार आहे. काही राजकीय लोकांची भेट घेतल्यास तुमची लोकप्रियता वाढेल. व्यापाऱ्यांनी विश्वासाने काम करावं. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  मकर (Capricorn) :

  ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळेल. मन प्रसन्न राहणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीगाठीचा योग आहे. आपला दिवस म्हणजे सुखात जाण्याचा संकेत आहे. तुम्हाला प्रॉपर्टी डीलमधून प्रचंड उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

   कुंभ (Aquarius):

  दिवसाची सुरुवात नव्या आशेनं होईल. कामं वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात आज ज्येष्ठांचा सल्ला घ्या. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. कामाच्या संबंधात काळजी घ्यावी लागेल. प्रेम संबंधात गैरसमज होण्याची शक्यता आहे. बचत योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  मीन (Pisces):

  नशिबापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवा. थोडा वेळ एकट्याने व्यतित करा. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या कामात प्रगती होईल. युवकांना परदेशी कामाच्या संधी आकर्षित करू शकतात. नोकरी करणार्‍यांसाठी दिवस चांगला असेल.
  शुभ रंग आणि अंक :  सोनेरी, 1