राशिभविष्य २८ सप्टेंबर, २०२१; ‘या’ 2 राशीच्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक भरपूर पैसा कमावून देऊ शकते; मात्र ‘या’ राशीतील व्यक्तींवर मित्रांकडून विषप्रयोग केला जाण्याची शक्यता आहे.

  मेष (Aries):

  व्यवसायात आनंदाची बातमी मिळेल. वरिष्ठांसमोर आपली गोष्ट ठेवण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस भरभराटीचा आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी ही योग्य संधी आहे. कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  वृषभ (Taurus):

  आपल्याला मंगळवारी शुभ संकेत मिळू शकतात. जबाबदाऱ्या निभावण्यासाठी योग्य दिशा मिळेल. एखादा मित्र उगाच जिव्हाळा दाखविण्याचा प्रयत्न करीत असेल तर वेळीच सावध व्हा! एखादी कल्पना डोक्यात घर करु शकते. खर्चावर ताबा ठेवा. ज्यांचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  मिथुन (Gemini):

  मंगळवार तुमच्यासाठी खास असेल. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबद्दल अधिक विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस खूप चांगला आहे. पैशाच्या व्यवहारात सावध राहा.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  कर्क (Cancer):

  मंगळवार तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. व्यवसायात चांगला नफा होईल. तुम्ही भविष्य लक्षात घेऊन गुंतवणूक करू शकता. नोकरीत तुम्हाला यश मिळेल. कोणत्याही जबाबदार कामात निष्काळजी राहू नका. तुमच्या मदतीसाठी सर्वजण तयार असतील. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  सिंह (Leo):

  नोकरी करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. व्यवसायिकांसाठी संमिश्र दिवस असणार आहे. कामाच्या संदर्भात केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले परिणाम देतील. जेमतेम ओळखी झालेले लोक आर्थिक गुंतवणुकीचे फसवे आमिष दाखवू शकतात; तुम्ही वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे. काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्यांचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  कन्या (Virgo):

  स्वतःवर विश्वास ठेवा. अधिक नफा मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसायात नातेवाईकांचं सहकार्य घेऊ शकता. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सक्रियता वाढेल. समाज आणि कुटुंबात तुमचा मान वाढेल.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  तूळ (Libra):

  कामात चांगल्या संधी मिळतील. सरकारी नियमांमुळे व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. नव्या भेटी-गाठी होतील. स्वतःची मालमत्ता घेण्याचे नियोजन असेल तर ते लवकरच पूर्ण होईल. विश्वासातील व्यक्तीकडून तुमच्यावर विषप्रयोग केला जाण्याची शक्यत आहे.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  वृश्चिक (Scorpio):

  तुमच्याकडे आज पैसे येऊ शकतात. नवीन प्रोजेक्ट हाती येतील. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत. अनोळखी व्यक्तींकडून दाखविण्यात येत असलेल्या आमिषांना बळी पडू नका. एखादी शुभवार्ता मिळेल. जुने वाद मिटतील. स्वत:ची काळजी घ्या. दिवस चांगला आणि भरभराटीचा आहे.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  धनु (Sagittarius):

  सकारात्मक विचारांनी कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल. नोकरीत बँकिंग क्षेत्रातील लोकांना चांगला नफा मिळेल. मंगळवारचा दिवस फायद्याचा असणार आहे. अनावश्यक गोड बोलून तुम्हाला कोणी तुमची आवडती वस्तू खायला देऊ शकते. मात्र, या यातून तुम्हाला जबरदस्त विषबाधा होण्याची शक्यता आहे. अचानक यशशिखरांवर पोहोचण्याची संधी आहे.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मकर (Capricorn):

  नवीन काम करण्याचा उत्साह असणार आहे. तुम्ही तुमच्या पराक्रम आणि धैर्याच्या जोरावर पैसे कमवू शकाल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. शेअर मार्केटमध्ये केलेली पैशाची गुंतवणूक भरपूर पैसा कमावून देईल. बऱ्याच अंशी तुम्ही यशस्वी ठराल. एखाद्या कार्यक्रमाचा बेत लगेचच आखला जाऊ शकतो.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  कुंभ (Aquarius):

  तुमचं मत बदलण्याचा दिवस आहे. उत्पन्नात वाढ होण्याची चांगली संधी आहे. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर या दोघांमध्ये यश मिळेल. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीमध्ये यश मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  मीन (Pisces):

  वेळेचा योग्य उपयोग करणं हिताचं ठरेल. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. मालमत्तेशी निर्णय घेण्यासाठी मंगळवारचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या ओळखीचा लाभ स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणारे बेपर्दा होतील. अशांना आपल्या आयुष्यातून काढून फेकलेलेच बरे.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7