राशिभविष्य २९ सप्टेंबर, २०२१;  ‘या’ 2 राशीच्या लोकांची विवाहपूर्व प्रेयसीसोबतच अचानक भेट होण्याची शक्यता आहे. पत्नीसोबतच प्रामाणिक राहावे, अन्यथा पेचप्रसंगात सापडू शकता.

  मेष (Aries):

  आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आजोळाकडून मानसन्मान प्राप्त होईल.तुमच्यावर काही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.एखाद्या कामाच्या निमित्ताने तुम्हाला आज शहराच्या बाहेर प्रवासाला जावे लागू शकते.संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. पत्नीकडून सहकार्य लाभेल.नोकरीच्या ठिकाणी गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळी थोडा त्रास होऊ शकतो.  ७७% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  वृषभ (Taurus):

  आज तुम्हाला राजकीय क्षेत्रात यशप्राप्ती होईल.राजकारणात सक्रिय सहभाग प्राप्त होण्याचे योग बनत आहेत.आज शत्रूंनी कितीही प्रयत्न केला तरीही तुम्हाला हरवणे त्यांना शक्य होणार नाही.घरातून बाहेर पडताना आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. दिवसाच्या उत्तरार्धात शुभ कामांवर केलेल्या खर्चामुळे तुमच्या किर्तीत वाढ होईल. पुण्य कार्यावर पैसे खर्च कराल. गुंतवणुकीतुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. ९९% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  मिथुन (Gemini):

  आज एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानकपणे तुमच्यासमोर येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज कुठल्याही व्यक्तीने तुमच्याकडे पैसे मागितल्यास नीट विचार करून मगच ते द्या त्यामुळे भविष्यात पैसे अडकून राहण्याची समस्या निर्माण होणार नाही. ९५% नशिबाची साथ लाभेल. संध्याकाळचा वेळ कौटुंबिक सदस्यांसोबत मजेत जाईल.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  कर्क (Cancer):

  आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र फलदायी आहे. जुन्या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताचा आदर केला जाईल. आज एखाद्या घरगुती उपयोगाच्या वस्तूची खरेदी केली जाऊ शकते. परंतु आपल्या बजेटची काळजी घ्या. अचानक पैश्यांची गरज भासल्यास कुणाकडे उधार मागावे लागणार नाहीत याची काळजी घ्या.  दांपत्य जीवन सुखमय असेल. ६९% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  सिंह (Leo):

  आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. व्यापारासंबंधित कामात आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासू शकते.ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल आणि ज्यांना अनुभव असेल अश्याच व्यक्तींकडून सल्ला घ्यावा.संध्याकाळी मैत्रिणींसोबत वेळ घालवाल.कौटुंबिक असो किंवा व्यापारिक कोणत्याही प्रकारच्या जबाबदाऱ्या आज तुम्ही पार पाडू शकता.सर्व ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल. ७९% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  कन्या (Virgo):

  आज महान व्यक्तींसोबत तुमची गाठभेट होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या डिलमुळे आज तुम्हाला फायदा होऊ शकतो.नवीन कामातील वैधानिक आणि टेक्निकल बाबींचा योग्य विचार करून मगच एखादा निर्णय घ्यावा.आज घरातील जुनी अडलेली कामे पूर्ण करता येतील.संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीची सोबत लाभण्याची शक्यता आहे.जी तुमच्यासाठी धनलाभाची स्थिती तयार करेल.आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही काळ अनुकूल आहे.परंतु बाजारभाव पाहून आणि विचार करूनच गुंतवणूक करा. ६६% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  तूळ (Libra):

  आज एखाद्या कलात्मक कार्यात तुम्हाला रुची निर्माण होईल.तसेच सर्व कामात जोडीदाराचे सहकार्य लाभेल.त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.आपल्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्या.कामाच्या ठिकाणी अचानक घडून आलेल्या परिवर्तनामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.स्त्री कर्मचारी आणि अधिकारी तुम्हाला मदत करतील. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अन्यथा तुम्हाला नुकसान झेलावे लागू शकते. ६१% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  वृश्चिक (Scorpio):

  आपल्या जवळच्या व्यक्ती व इतरही व्यक्तींच्या भावना समजून घेऊन त्यानुसार आपले वागणे ठेवल्यास आज तुम्हाला समाधान लाभू शकते.काहीवेळेस इतरांचे म्हणणे ऐकण्यात काहीही गैर नाही.त्यांचे म्हणणे योग्य असल्यास त्यावर अंमल करावा.आज व्यापार किंवा नोकरीच्या ठिकाणी टीम वर्कच्या माध्यमातून गंभीर समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. ६५% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  धनु (Sagittarius):

  आज बऱ्याच दिवसांपासून अडकलेले तुमचे पैसे परत मिळतील.नवीन संबंधात स्थैर्य प्राप्त होईल.राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम यशप्राप्ती होईल,प्रयत्न करत राहा.रात्री आपल्या प्रियजनांसोबत एखाद्या मंगलकार्यात सहभागी होता येईल.वेळ मजेत जाईल.एखाद्या जुन्या मित्राशी झालेली भेट तुम्हाला भविष्यात आर्थिक लाभ मिळवून देईल. ८१% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  मकर (Capricorn):

  आज तुम्हाला भरपूर मानसन्मान मिळेल.जोडीदार आणि व्यवसायातील भागीदार यांच्याकडून सहकार्य लाभेल.आज अचानक धनप्राप्ती झाल्याने तुमचे कर्ज कमी होण्यास मदत होईल.त्यामुळे आज ज्या व्यक्तींकडून तुम्ही पैसे उधार घेतले असतील त्यांच्यापैकी जास्तीत जास्त व्यक्तींचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करावा. विवाहपूर्व प्रेयसीसोबतच अचानक भेट होण्याची शक्यता आहे. ६७% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  कुंभ (Aquarius):

  आज घरगुती कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. धैर्याने काम करा. आज वाहन चालवताना विशेष सतर्कता बाळगा.शारिरीक थकवा जाणवेल. संध्याकाळचा वेळ आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यामध्ये जाईल.घरातील वृद्ध माणसांशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.त्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. व्यवसाय बदलण्याचा विचार करत असला तर हा योग्य काळ आहे. ५५% नशिबाची साथ लाभेल.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मीन (Pisces):

  आज ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकार प्राप्त होतील.आज भरपूर मेहनत करूनही कमी लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतु निराश होऊ नका. मन लावून आपली कामे पूर्ण करा. अनोळखी मुलीकडून फोनवर प्रेमप्रस्ताव येण्याची शक्यता आहे. पत्नीसोबतच प्रामाणिक राहावे, अन्यथा पेचप्रसंगात सापडू शकता. भावंडांसोबतच्या नात्यात प्रेम वाढेल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7