सिंह दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; दैनंदिन व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरू शकतो

    सिंह (Leo) :

    कामाचे काटेकोर नियोजन करा. स्वत:च्या बुद्धीची छाप इतरांवर पाडाल. अनेक काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कोणत्यातरी प्रकारच्या विचारांमध्ये गुंतून जाल. कामात मन लागणार नाही. चंद्र आज तुमच्या सातव्या स्थानी विराजमान असल्याने वैवाहिक जीवनात चांगले बदल घडू शकतात. या दिवशी या राशीचे काही लोक जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवू शकतात. दैनंदिन व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरू शकतो. आज ८२% नशिबाची साथ आहे. बजरंगाचे नामस्मरण करा.

    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, ७