तुळ दैनिक राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२१ ; कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे

    तुळ (Libra):

    नशीब तुमच्या बाजूने आहे, परंतु वाहन चालवताना काळजी घ्या आणि अपघात टाळा. शक्य असल्यास रात्री गाडी चालवू नका. तुम्ही अनेक गोष्टींवर पैसे खर्च करु शकता, काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जुन्या आजारातून मुक्ती मिळेल. डॉक्टरांकडून येणारा आरोग्य अहवाल पॉझिटिव्ह येईल. आईच्या तब्येतीत आज चांगले बदल होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आज ७५% नशिबाची साथ आहे. बहीण किंवा मावशीला भेटवस्तू द्या.

    शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६