तुळ दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल

    तुळ (Libra) :

    वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच उचित ठरेल. महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येऊन मनावरील काळजीचे सावट मिटेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, ६