तुळ दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते

    तुळ (Libra):

    राशीमध्ये संचार करणारा चंद्र तुमच्या सप्तम भावाला प्रभावित करेल. त्यामुळे आज आपल्या जोडीदारासोबत तुम्ही मजेत वेळ घालवाल. या राशीतील व्यावसायिक आज आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भविष्यासंबंधीत योजना बनवतील. तुमच्या कुटुंबात परस्पर सामंजस्य वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक प्रकरणावर स्पष्ट भूमिका ठेवा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते.

    शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४