धनु दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येऊ शकेल

    धनु (Sagittarius) :

    स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येऊ शकेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३