धनु दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही

    धनु (Sagittarius):

    आज तुम्हाला कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव मिळेल कारण आज चंद्र तुमच्या सुख भावामध्ये स्थित आहे. या राशीतील काही व्यक्ती आज वाहन खरेदी करण्याचा विचार आपल्या आईवडील किंवा जोडीदारासोबत शेअर करतील. तुमचा दिवस सामान्य सुरू होईल. तुम्ही पैशांचे फेरफार करण्यात मग्न असाल. जर तुम्ही कुटुंबातील सदस्याबरोबर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले होईल. कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही.

    शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३