धनु दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; महत्त्वपूर्ण मिटींग आणि काम करण्यासाठी दिवस चांगला आहे

    धनु (Sagittarius) :

    पैसा गुंतवण्यासाठी उत्तम दिवस. मनाचा आवाज ऐकून अनेक निर्णय घ्याल. हे निर्णय यशस्वीही ठरतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नवे काम आणि व्यवहार समोर येतील. महत्त्वपूर्ण मिटींग आणि काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. या दिवशी राशीचा चंद्र तुमच्या तिसऱ्या स्थानी असेल, त्यामुळे या राशीच्या काही लोकांना या दिवशी कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. या दिवशी सामाजिक स्तरावर कोणीतरी दुखावले जाईल असे वर्तन करणे टाळावे. लहान भाऊ आणि बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. आज ८४% नशिबाची साथ आहे. गुरुच्या बीज मंत्राचा जप करा. वर्षाचा शेवटचा दिवस लाभदायी ठरेल. वर्षभरात जे मिळविता आले नाही, ती गोष्ट आज सहजपणे मिळेल. फक्त तुमच्या तोंडावर गोड बोलणारे आणि मागे तुमचे अहीत चिंतणाऱ्या घटकापासून सावध राहा.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४