धनु दैनिक राशीभविष्य : ९ डिसेंबर २०२१ ; पती-पत्नी मधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे

    धनू (Sagittarius) :

    जुन्या अडचणी दूर होतील. परिस्थिती अनुकूल असेल. अडकलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही नव्या कल्पना मिळतील. उत्साह वाढेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. साथीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थांसाठी दिवस काही प्रमाणात नकारात्मक स्वरूपाचा असेल. वडिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्या. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस सामान्य असेल. पती-पत्नी मधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. एखादी रणनीती बनवून गुंतवणूक करा, तुम्हाला यश मिळेल. जे कीटकनाशकांचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे जास्त विक्री होईल. करियरच्या बाबतीत तरुणांना काही मोठे यश मिळू शकते.

    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, ७