वृश्चिक दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल, भाऊ आणि मित्रांकडून सहयोग मिळेल

    वृश्चिक (Scorpio) :

    आज तुमच्या मनात अनेक योजना असतील. वेळेचे योग्य नियोजन केले तर यशस्वी व्हाल. पैसे कमावण्याचा विचार करार. आजचा दिवस चांगल्या लोकांसोबत घालवाल. एखादी नवीन गोष्ट करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या. रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल. भाऊ आणि मित्रांकडून सहयोग मिळेल. चंद्र आज तुमच्या चतुर्थ स्थानी विराजमान होईल, हे सुखाचे स्थान म्हणूनही ओळखले जाते.. या स्थानी चंद्राची उपस्थिती कौटुंबिक सुखात वृद्धी करू शकते. काही लोकांना या दिवशी स्थावर मालमत्तेचा लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणत्याही न्यायालयीन खटल्याबद्दल काळजी वाटत असेल तर आज त्याचे निराकरण देखील होण्याची शक्यता आहे. आज ८६% नशिबाची साथ आहे.

    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, ७