वृश्चिक दैनिक राशीभविष्य : ६ जानेवारी २०२२ ; रोजगाराच्या क्षेत्रात योग्यता वाढल्याने यश प्राप्ती होईल

    वृश्चिक (Scorpio) :

    प्रियजन आणि जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल.आईचे आरोग्य चांगले राहील. दुपारपर्यंत चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. रोजगाराच्या क्षेत्रात योग्यता वाढल्याने यश प्राप्ती होईल. व्यापारी वर्गासाठी अतिशय चांगला काळ आहे. प्रेम विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. गुंतवणूकीतून लाभ होईल आणि संपत्तीत वाढ होईल. संध्याकाळच्या वेळी पाहुण्यांचे आगमन झाल्याने आनंद होईल. मंगलकार्यात उपस्थित राहिल्याने सन्मानात वाढ होईल.