वृषभ दैनिक राशीभविष्य २४ डिसेंबर २०२१ ; आर्थिक परिस्थिती सुधारल्याने तुम्ही खर्च करण्याच्या मनःस्थितीत असाल

    वृषभ (Taurus) :

    आज चंद्र तुमच्या राशीमध्ये विराजमान असल्याने तुमचा व्यवहार शालीन राहील. आज तुम्ही आपल्या गोड बोलण्याने जोडीदाराला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कुटुंबातील एका तरुण सदस्याच्या यशाचा अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी दिवस लाभदायक असेल. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने तुम्ही खर्च करण्याच्या मनःस्थितीत असाल. नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात.

    शुभ रंग आणि अंक : नारंगी, ७