वृषभ दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; कार्यालयात स्वत:वर नियंत्रण ठेवा, पदोन्नती होण्याची शक्यता आहे

    वृषभ (Taurus) :

    नियोजित गोष्टी अचूकपणे पार पडतील. बऱ्याच काळापासून असलेली एखादी अडचण सुटेल. मित्रांशी संबंध सुधारतील. नव्या लोकांना भेटाल. कार्यालयात स्वत:वर नियंत्रण ठेवा. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. या दिवशी राशीचा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानी राहील, त्यामुळे तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात योग्य बदल पाहायला मिळतील. जर एखाद्या सहकाऱ्याशी मतभेदाची स्थिती असेल तर त्यात सुधारणाही होऊ शकते. या दिवशी या राशीचे व्यापारी कर्मचार्‍यांना खूश करण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही सरप्राईज गिफ्ट देऊ शकतात, ज्यामुळे कामाच्या वातावरणात चांगले बदल दिसून येतील. आज ८४% नशिबाची साथ आहे. १० वर्षांपेक्षा लहान मुलींना भेटवस्तू द्या.

    आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६