दैनिक राशी-भविष्य दि. ५ डिसेंबर २०२१ : आज प्रिय स्त्रीसोबत पर्यटनाचा योग आहे

    वृषभ (Taurus) :

    मंगल कार्यांसाठी आजचा दिवस शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. लग्न जुळून येण्याचे योग आहेत. आज प्रिय स्त्रीसोबत पर्यटनाचा योग आहे. मनातील अनेक गोष्टी तिच्यासोबत शेअर कराल. भावंडं आणि वडीलधाऱ्यांशी असलेले नाते सौहार्दपूर्ण आणि प्रेमळ राहील.
    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४