वृषभ दैनिक राशीभविष्य : ९ डिसेंबर २०२१ ; नवीन कामं हाती घेण्यासाठी इच्छुक असाल तर आणखी नवीन कामे हाती लागतील

    वृषभ (Taurus) :

    आज तुमचं व्यक्तीमत्व आकर्षक राहील. घर, जमीनीबद्दल काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अर्धे राहीलेले काम पूर्ण कराल. मनात आलेल्या शंकांचे निराकरण होईल. दिवसभर पैशांविषयी विचार कराल. नवीन कामं हाती घेण्यासाठी इच्छुक असाल तर आणखी नवीन कामे हाती लागतील. चांगली बातमी कानी पडेल. आरोग्याची काळजी घ्या. हुशारीने काम केले तर आपण अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिकदृष्ट्या सक्रिय लोक इतरांना मदत करण्यात आनंद घेतील.

    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, ६