आजचे राशी भविष्य दि. ३० सप्टेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांनी झटपट यश मिळवण्याच्या नादात चुका करू नये. तसेच ‘या’ राशीच्या लोकांनी डोकं लावून काम करावे लागेल; नाहीतर नुकसान होईल.

  मेष (Aries):

  तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नफ्याचे नवे मार्ग सापडतील. अनेक प्रलोभनं आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. बऱ्याच काळापासून अडकलेली गोष्ट पूर्ण होईल. मनाविरुद्ध पैसे खर्च करावे लागतील. डोकेदुखी आणि डोळ्यांचे विकार उदभवतील.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  वृषभ (Taurus):

  हातात येणारं काम तुम्ही नीट विचारपूर्वक करा. कोर्टाच्या कामातून तुम्ही सुटका करू शकता. कोणतीही जोखीम उचलणं टाळा. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रयत्न करा, अडचणींवर तोडगा काढा. नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीच चढ- उतार जाणवतील.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मिथुन (Gemini):

  तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. प्रॉपर्टी डीलरसाठी सोमवार अधिक फायदेशीर आहे. खर्चावर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज कोणतेही नवे व्यवहार करु नका. एखाद्या ठिकाणी पैसे अडकू शकतात. महागड्या वस्तूंची खरेदी करण्याचा प्रयत्न कराल. सावध राहा. जास्त विचार करण्यात वेळ व्य़तीत करु नका.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  कर्क (Cancer):

  स्वत:साठी वेळ काढा. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी दिवस खूप उत्तम आहे. उत्पन्न चांगले राहील. पटकन यश मिळवण्याच्या नादात चुका करू नका. नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतील. दैनंदिन कामांमध्येही अडचणी येतील.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  सिंह (Leo) :

  आपलं मन आनंदी राहील. ऑफिसमध्ये बॉस खुश राहील. डोकं लावून काम करा नाहीतर नुकसान होईल. दुसऱ्याच एखाद्या गोष्टीवर तुमचं लक्ष असेल. कामाच्या ठिकाणी कोणाचीतरी नकळत मदत होईल. व्यापार वाढवण्याचा विचार करा, फायदा होईल. प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न कराल.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  कन्या (Virgo) :

  दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल करा फायदा होईल. कनिष्ठांची मदत मिळेल. अडचणी दूर होतील. दिवस थकवणारा असेल. आराम करण्याला प्राधान्य द्या. कुटुंबात सुखशांती नांदेल. कामाच्या ठिकाणी तडजोड करावी लागू शकते.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  तूळ (Libra) :

  तुम्हाला नवीन दागिने ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. पैसे लवकर मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका, काळजी घ्या. दैनंदिन कामं पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश करु नका.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  वृश्चिक (Scorpio):

  मन प्रसन्न राहील. व्यापाऱ्यांसाठी खूप उत्तम दिवस आहे. पटकन कोणावरही विश्वास ठेवणं घातक ठरेल. आर्थिक चणचण संपेल. मिळकत आणि खर्च यांच्यात समतोल असेल. साथीदारावर राग व्यक्त करु नका. कोणावरच भावना लादू नका.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  धनु (Sagittarius):

  दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. घरून काम करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात. कौटुंबीक समस्यांवर लक्ष द्या. काही घरगुती प्रकरणांमध्ये जास्त वेळ जाईल. कौटुंबीक नात्यांमध्ये सुधारणा होईल. स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. पोटाचे विकार उदभवतील.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  मकर (Capricorn):

  आपल्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचे कोणतेही छंद किंवा कौशल्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. काही नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. वेळ चांगला आहे. अविवाहितांसाठी चांगला काळ आहे. प्रवासयोग आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण कराल.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  कुंभ (Aquarius):

  छोट्या गोष्टींवर राग येणे टाळले पाहिजे. व्यवसाय करण्याआधी नियोजन आवश्यक आहे. अडलेलं काम पुन्हा सुरू करू शकता. कामात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी अतरांकडून सन्मान मिळेल. अपूर्ण कामं मार्गी लागतील. नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत गुंतागुंत वाढेल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मीन (Pisces) :

  तुमचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. घाईघाईत कोणतंही काम करु नका. आर्थिक बाबतीत चिंता करावी लागेल. आज आखलेले बेत गुप्तच ठेवा. वाद-विवादामध्ये अडकू शकता.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7