कन्या दैनिक राशीभविष्य १२ डिसेंबर २०२१ ; दिवस चांगला घालवण्यासाठी तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल

    कन्या (Virgo) :

    आरोग्याची काळजी घ्या. काही आजारांनी त्रस्त व्हाल. ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भावनिक सहभाग आणि लांबचा प्रवास टाळावा. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय असू शकते. दिवस चांगला घालवण्यासाठी तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. मन प्रसन्न राहील. कामात यश मिळेल. नवीन काम मिळू शकतं. फिरण्यासाठी घराबाहेर पडाल, ज्यामुळे तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल. व्यवसायात फायदा होईल असे दिसते.

    शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३