
कन्या (Virgo) :
कठोर परिश्रम आपल्याला कामी येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कुटुंबासोबत आज प्रवासाचा योग आहे. लोकांप्रती तुमच्या मनातील परोपकाराची भावना या दिवशी दिसून येईल. आज तुम्ही अज्ञात व्यक्तीची मदत करू शकता. कन्या राशीच्या लोकांना वडील आणि वडिलांसारख्या लोकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी नशीब तुमची साथ देईल, त्यामुळे आज बिघडलेली कामेही मार्गी लागू शकतात. मोठ्यांच्या सल्ल्याने कोणतेही काम करता येईल. आज ८२% नशिबाची साथ आहे. किन्नरांचा आशीर्वाद घ्या. आवडत्या मैत्रिणीकडून गोवा सहलीला जाण्याची ऑफर मिळेल.
शुभ रंग आणि अंक : सोनेरी, १