कन्या दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; नोकरी किंवा धंद्यात पुढे जाण्याची संधी मिळेल, एखादा अडथळा आल्यास घाबरून जाऊ नका

    कन्या (Virgo) :

    आर्थिक आवक वाढल्यामुळे भावनिकदृष्ट्या संतुलित राहाल. नोकरी किंवा धंद्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. एखादा अडथळा आल्यास घाबरून जाऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि शांतपणे मार्ग काढा. यश नक्कीच पदरात पडेल. घर आणि जमीन जुमल्याच्या व्यवहारात यश मिळेल. चंद्र आज तुमच्या सहाव्या स्थानी विराजमान होईल. या दिवशी या राशीच्या लोकांच्या मनात अनावश्यक काळजी घर करू शकते. जर एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर तो या कालावधीत कर्ज परत मागू शकतात. जोडीदार आज खऱ्या मित्राप्रमाणे तुमची साथ देईल, ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. सासरच्या लोकांकडून फायदा होऊ शकतो. आज ७०% नशिबाची साथ आहे. बहिणीला तिच्या आवडीचा आशीर्वाद द्या.

    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३