
मेष (Aries) :
आज प्रवास करण टाळा. व्यावसायात आणि नोकरीत धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात काही नवीन आणि चांगल्या गोष्टी घडतील. अडचणींमध्ये मित्र परिवार मदत करण्यासाठी धावतील. स्वत:साठी वेळ काढाल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5
वृषभ (Taurus) :
आजच्या दिवशी चांगली बातमी कानावर येईल. गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या लोकांना आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन चांगल राहिलं. रखडलेली कामे पूर्ण करा.
शुभ रंग आणि अंक : लाल, 7
मिथुन (Gemini) :
कोणत्याही कामासाठी घरच्यांची मदत घ्या. प्रेम संबंधात कोणतीही अडचण नको असेल तर इतरांच्या बोलण्यावर लक्ष देवू नका. दैनंदिन कामं पूर्णत्वास न्याल. आरोग्याची काळजी घ्या. साथीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल.
शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4
कर्क (Cancer) :
भावंडांकडून उधार पैसे मागण्याची वेळ येईल. घरातल्या कामांमुळे थकवा जाणवेल. त्यामुळे मानसिक तणाव देखील येईल. मात्र जास्त विचार करू नका. नवी जबाबदारी मिळेल. आर्थिक चणचण संपुष्टात येईल.
शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6
सिंह (Leo) :
कामात चित्त लागणार नाही. कारण आज तुमची प्रकृती काही प्रमाणात चांगली नसेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. काही मित्र तुमच्या घरी येतील. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत अधिक वेळ व्यतीत करता येईल. आरोग्याकडे लक्ष द्या. अविवाहितांना प्रेमंसंबंधांमध्ये लग्नाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.
शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3
कन्या (Virgo) :
दिवस चांगला आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुम्ही मांडलेलं मत योग्य आहे, हे इतरांना पटवून देण्यासाठी जीवनसाथीकडून मदत मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2
तूळ (Libra) :
अधिक विचार केल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. या राशीच्या लोकांना अचनाक धन लाभ होण्याची शक्याता आहे. बाहेर फिरायला जायच्या योजना आखाल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील.
शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1
वृश्चिक (Scorpio) :
रागावर नियंत्रण ठेवा. नवे करार कराल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. तुम्ही आखलेले बेत गुलदस्त्यात ठेवा. वादात अडकू नका. व्यायपारात होणाऱ्या फायद्याचं प्रमाण कमीच असेल. बदलीचे योग आहेत. दिवस आव्हानात्मक असेल. विचाराधीन कामं पूर्णत्वास जातील.
शुभ रंग आणि अंक : निळा, 8
धनु (Sagittarius) :
कुटुंबात सुख-शांती नांदेल. चांगल्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. सामाजिक स्तरावर तुमचा सन्मान केला जाईल. साथीदाराकडून आर्थिक पाठबळ मिळेल. आज गुंतवणूक करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. अविवाहितांना प्रेमंसंबंधांमध्ये येण्याची संधी मिळेल.
शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4
मकर (Capricorn) :
अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस अतिशय उत्साही आहे. जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
शुभ रंग आणि अंक : केशरी, 6
कुंभ (Aquarius) :
मानसिक आरोग्य राखण्यासाठी छंद जोपासा. व्यापार करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. आज स्वतःच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करला तर ज्येष्ठ व्यक्ती नाराज होतील. आयुष्यात लवकरच एक खास व्यक्ती येईल. दिवस चांगला आहे. जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3
मीन (Pisces) :
सकारात्मक विचार कराल तर सर्व अडचणींवर मात करू शकाल. घरात कार्यक्रम असल्यामुळे अधिक खर्च होईल. ज्यामुळे काही दिवस आर्थिक चणचण भासेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेम प्रकरणामुळे मन आनंदी राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1