Weekly Horoscope December 27 to January 2, 2021 nrng
साप्ताहिक राशी भविष्य दि. २७ डिसेंबर ते २ जानेवारी २०२१; जाणून घ्या अशी आहे या आठवड्यात ग्रहांची चाल

मेष-  आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात राजकीय क्षेत्रात किंवा सार्वजनिक जीवनात यश कमीच मिळेल. यात्रा – प्रवास किंवा धार्मिक कार्यांसाठी खर्च होईल. स्थावरा संबंधित प्रश्नात सावध राहावे. आपणास बोलताना खूप काळजी घ्यावी लागेल. आता कामात आपण उत्तम प्रकारे पुढे जाऊ शकाल व स्पर्धेत आपल्या विजयावर शिक्का मोर्तब करू शकाल. आपण कोणत्याही पदावर असलात, मालक असलात किंवा नोकरी करत असलात तरी सुद्धा आपल्या कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगण्यात येईल व त्याने प्रेरित होऊन अधिक उत्साहाने मार्गक्रमण कराल. त्यामुळेच आपल्या प्राप्तीत वाढ होईल. काही लाभ मिळण्यात विलंब झाला तरी फायदा नक्कीच होईल. आपल्यात जोम व उत्साहा बरोबरच थोडा क्रोध सुद्धा वाढेल. त्यामुळे वाणी संयमित असणे गरजेचे आहे. वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्ती बरोबर संवाद साधताना हे ध्यानात ठेवावे. प्रेमाची कबुली देण्यासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. पहिले दोन दिवस वगळता इतर दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आरोग्य चांगले राहणार असले तरी अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे.

वृषभ-  या आठवड्यातील ग्रहस्थिती आपणास अधिक संपत्ती प्राप्त करण्यासाठी, जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी मदतरूप ठरणारी आहे. आपणास जर एखादी आर्थिक समस्या भेडसावत असेल तर ह्या ग्रहस्थितीमुळे त्यातून आपली सुटका होईल. आठवड्याच्या सुरवातीस व अखेरीस व्यावसायिक बाबींकडे अधिक लक्ष देऊ शकाल. मागील काही दिवसांपासून आपण जर एखाद्या शासकीय किंवा कायदेशीर समस्यानी ग्रासले असाल तर आता त्याचे निराकरण होऊ शकेल. आठवड्याची अखेर सर्जनात्मक बाबी, रोमान्स, प्रेम, प्रवास व उच्च शिक्षण ह्यासाठी अनुकूल आहे. सुरुवातीच्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम होऊ शकेल, मात्र त्या नंतरच्या दिवसात आळसामुळे अभ्यासातून लक्ष उडण्याची शक्यता आहे. असे असले तरी उत्तरार्धात कारकिर्दीच्या बाबतीत गंभीर झाल्याने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ लागेल. आठवड्याच्या सुरवातीस वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. एकमेकांच्या भावनांचा आदर कराल. आठवड्याच्या मध्यास भावनांची अस्थिरता व अतिरेक होऊन आपल्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आपण जर आरोग्याची नीट काळजी घेतली नाहीत, तर त्याची मोठी किंमत आपणास चुकवावी लागू शकते.

मिथुन-  आठवड्याच्या सुरवातीस व्यावसायिक आघाडीवर आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याने व आपली प्रगती साध्य झाल्याने आपणास मानसिक समाधान लाभेल. आपण सध्या उर्जेसह कामात पुढे जाण्याची इच्छा बाळगून असाल व त्याचा प्रत्यय आपल्या कामगिरीतून स्पष्टपणे दिसून येईल. सामाजिक आघाडीवर सुद्धा आपली सक्रियता वाढेल व त्यामुळे व्यावसायिक आघाडीवर आपणास फायदा होऊ शकेल असे एखादे काम आपण समाजासाठी करण्याची शक्यता आहे. सुरवातीस आपणास आर्थिक लाभ होऊ शकेल. काही प्रलंबित लाभ त्वरित मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च टाळून बचत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उत्तरार्धात आपण स्वतःसाठी व आपले छंद जोपासण्यासाठी खर्च करण्याचा विचार कराल. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने, स्पा, सौंदर्योपचार इत्यादीत आपला खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरवातीस जोरात होईल, मात्र आठवड्याच्या मध्यास आळसामुळे अभ्यासाची गती मंदावेल. आपल्या मनात प्रेमाच्या भावना व भिन्नलिंगी आकर्षण चांगले असल्याने पूर्वार्धात संबंधांचे उत्तम सुख उपभोगू शकाल, परंतु आठवड्याच्या मध्यास संबंधांपासून आपण विन्मुख व्हाल. आठवड्याचे अखेरचे दिवस चांगले आहेत. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस स्फूर्तिदायी असले तरी मधल्या दिवसात अनिद्रा व थकवा ह्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे.

कर्क-  आठवड्याच्या सुरवातीस आपणास नशिबाची साथ मिळून आपल्या कर्माच्या फलस्वरूपात आर्थिक फायदा होईल. आपल्या आर्थिक स्थितीत ग्रहस्थितीमुळे पुन्हा परिवर्तन घडून येईल. त्यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने कामे कराल. अचानक कर्ज काढावे लागू नये म्हणून आपल्या राखीव निधीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सुरवातीस आपण व्यावसायिक आघाडीवर अधिक लक्ष केंद्रित कराल. देशांर्तगत कार्ये किंवा जन्मभूमीहून दूरवरच्या ठिकाणाशी जोडले गेलेल्या व्यक्तींसाठी सुरवातीचे दिवस आशास्पद असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यात सुद्धा उत्तरार्धात कारकिर्दीच्या बाबतीत अधिक गंभीर होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात सार्वजनिक जीवनात व सामाजिक प्रसंगात सक्रिय व्हाल. ह्या आठवड्यात विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आर्थिक लाभाची अपेक्षा आपण बाळगू शकता. ह्या आठवड्यात आरोग्य उत्तम राहणार असल्याने त्याची काळजी करण्या सारखे नाही.

सिंह-  आठवड्याच्या सुरवातीस मानसिक व्याकुळतेमुळे आपले कामात लक्ष लागू शकणार नाही. ह्या व्यतिरिक्त संबंधांकडे सुद्धा आपले थोडे दुर्लक्ष होईल. आपण कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत काही करण्या ऐवजी मानसिक शांतता पाळून आत्मपरीक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणे हितावह होईल. दुसऱ्या दिवसाच्या दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आपला दृष्टिकोन सकारात्मक होईल. कुटुंबियांच्या गरजा व इच्छा गंभीरपणे समजून घेण्यास आपण समर्थ व्हाल. व्यावसायिक आघाडीवर आपली कल्पना, कार्यक्षमता व दूरदर्शीपणा वाढेल व त्यामुळे आपली कामगिरी उंचावू शकेल. दूरवरच्या कार्यात सुद्धा उत्तम फळ मिळू शकेल. नोकरी करणारे सुद्धा आपले बौद्धिक चातुर्य व वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन ह्यांच्या जोरावर अपेक्षित कामगिरी करू शकतील. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागले नाही तरी त्या नंतरच्या दिवसात ते एकाग्रचित्त होऊन अभ्यास करू शकतील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक काही समस्या होईल असे दिसत नाही. पहिल्या दिवशी बेचैनी जाणवेल इतकेच.

कन्या-  आठवड्याच्या सुरवातीस आपणास परदेशात राहणारे मित्र किंवा नातेवाईक ह्यांच्या कडून आनंददायी बातमी मिळेल. भागीदारी कार्यात पुढे जाऊ शकाल. प्रियव्यक्तीच्या विशेषतः वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात वेळ उत्तम घालवू शकाल. आपल्यात चांगला समन्वय राहील. असे असले तरी दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळ नंतर आपले मन काहीसे व्याकुळ होईल ज्याचा परिणाम आपल्या संबंधांवर व व्यावसायिक आघाडीवर होताना दिसेल. आठवड्याच्या मध्यास कोणताही महत्वाचा निर्णय घेणे टाळावे. आठवड्याच्या मध्यास विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता थोडी वाढवावी लागेल. उत्तरार्धात आपले अध्ययन चांगले होईल. उत्तरार्धात व्यावसायिक आघाडीवर चांगले परिणाम मिळताना दिसून येईल. आपला स्वभाव भावनाशील होईल. दूरवर राहणाऱ्या आप्तांशी आपण विविध माध्यमांच्या मदतीने संपर्कात याल. आठवड्याच्या मध्यास पोटाचे विकार होण्याच्या शक्यतेमुळे खाण्या – पिण्याकडे थोडे लक्ष द्यावे. ज्यांना मूळव्याध किंवा पित्त विकार ह्यांचा त्रास असेल त्यांनी सुद्धा आठवड्याच्या मध्यास काळजी घ्यावी.

तुळ-  आठवड्याच्या सुरवातीस नोकरी करणाऱ्यांसाठी व किरकोळ काम करणाऱ्यांसाठी अनुकूलता लाभेल. गूढ व आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा आठवड्याच्या उत्तरार्धात चांगली संधी मिळू शकेल. आठवड्याच्या मध्यास प्रियव्यक्तीचा प्रेमळ व सुखद सहवास लाभू शकेल. उत्तरार्धात आपले मन काहीसे विचलित झाल्यामुळे आपण आर्थिक किंवा व्यावसायिक जोखीम घेऊ नये. शेअर्स – सट्टा किंवा जुगार सदृश्य प्रवृत्तीत सहभागी झाल्यास कष्टाची कमाई वाया जाईल. आठवड्याच्या मध्यास आपले वाक्चातुर्य खुलून उठेल. उत्तरार्धात आपली परोपकाराची भावना लोकसेवा घडवून आणेल. आठवड्याच्या मध्यास रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. कुटुंब व कार्यक्षेत्रात समतोल साधलात तर संभाव्य घर्षण टाळू शकाल. दूरवर राहणाऱ्या संतती संबंधी चांगली बातमी मिळेल किंवा त्यांची भेट घडेल. आठवड्याच्या अखेरीस सर्दी, कफ, ताप इत्यादींचा त्रास संभवतो. नियमितपणे प्राणायाम केल्यास आपली प्रकृती चांगली राहील

वृश्चिक- आठवड्याच्या सुरवातीस आपली कल्पनाशक्ती खुलून उठल्यामुळे नवनवीन विचार मनात येतील जे नोकरी – व्यवसायात लाभदायी होतील. आठवड्याच्या पूर्वार्धात नोकरी करणाऱ्यांची कार्यालयात प्रशंसा व पदोन्नती संभवते. आर्थिक लाभ सुद्धा होतील. सुरवातीस आपल्यात रोमान्सची भावना उत्कट झाल्याने आपण प्रियव्यक्तीच्या सहवासात अधिकाधिक वेळ घालवण्यास प्राधान्य द्याल. ह्या व्यतिरिक्त उत्तरार्धात सुद्धा वैवाहिक जीवनाचे उत्तम सौख्य आपण उपभोगू शकाल. भागीदारी व संयुक्त साहसाचे कार्य किंवा करार करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्यास आरोग्य काहीसे नरम होण्याची शक्यता आहे. विशेषतः अयोग्य आहार किंवा शरीरातील उष्णता ह्यामुळे प्रकृतीस त्रास संभवतो. अशा परिस्थितीत ध्यान – धारणा व योगासने करून फायदा होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपण जनसेवा, परोपकार किंवा धार्मिक कार्यात रुची घ्याल. विद्यार्थी अभ्यासाचे योग्य नियोजन करून मार्गक्रमण करू शकतील.

धनू- आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर आपण अधिक लक्ष केंद्रित कराल. कुटुंबियांसह एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आपल्या वाणीच्या प्रभुत्वामुळे कामाच्या ठिकाणी आपण पुढे वाटचाल कराल व त्यामुळे प्राप्तीसाठी सुद्धा नवीन शक्यता निर्माण होऊ शकतील. दुसऱ्या दिवसाच्या दुपार नंतर प्रणयी जीवनास नवीन दिशा सापडेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. संततीशी संबंधित बाबीत आपण व्यस्त राहाल. भिन्नलिंगी व्यक्तीप्रती आकर्षण वाढेल व त्यांचा सहवास सुद्धा लाभू शकेल. मात्र, अशा भेटी दरम्यान आपला स्वभाव व वाणी सौम्य राखावी. जुनी वसुली, कर्ज किंवा जुन्या वस्तू विकून आर्थिक लाभ होईल. सुरवातीस आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, मात्र उत्तरार्धात ऋतुजन्य विकार होण्याची शक्यता आहे. आहाराची काळजी घेतल्यास मोठे आजार होण्याची शक्यता नाही. वाहन खरेदीसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. पूर्वार्धात विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास होऊ शकेल.

मकर-  या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ होण्याची किंवा प्राप्तीचे स्रोत वाढण्याच्या दिशेने आपण सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. संतती व वडिलधाऱ्यांकडून आपणास सौख्य व लाभ प्राप्ती होईल. पूर्वार्धात आपल्या मित्रवर्तुळात नवीन मित्रांची भर पडेल. ह्या आठवड्यात कोर्ट – कचेरीशी किंवा शासनाशी संबंधित कार्यात सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपली प्रतिमा मलीन होईल अशा कामांपासून दूर राहावे. आपल्या विरुद्ध काही प्रश्न उपस्थित होतील अशा सर्व कामांपासून सुद्धा दूर राहावे. भावनेच्या भरात एखादे अविचारी कृत्य आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी. जर कार्यनिष्ठेने व चिकाटीने कामे केलीत तर व्यावसायिक प्रगतीसाठी चांगली संधी मिळू शकेल. एखाद्या छोट्या प्रवासा दरम्यान कामाच्या बाबतीत नवीन शक्यता शोधू शकाल. पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध संबंधांसाठी अधिक अनुकूल आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसात आपण कुटुंबियांच्या सहवासात अधिक वेळ राहू शकाल. उत्तरार्ध आपण प्रियव्यक्तीसाठी राखून ठेवाल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना गाफील न राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कंबरदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा पित्त विकार ह्यांचा त्रास संभवतो.

कुंभ-  व्यवसायाच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल व त्यांच्या सहकार्यामुळे आपण कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडू शकाल. ह्या आठवड्यात आपणास एकाहून अधिक प्रकारे लाभ होऊ शकतील. आपली कामे सुद्धा सहजपणे पार पडल्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण समाधानी व्हाल. पैतृक संपत्तीतून फायद्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. कुटुंबीयांप्रती अधिक संवेदनशीलता असल्याने उत्तरार्धात आपण त्यांची अधिक काळजी घ्याल व त्यांच्यासाठी सढळहस्ते खर्च कराल. आठवड्याच्या मध्यास वाणी संयमित ठेवून कौटुंबिक कलह टाळू शकाल, तसेच व्यावसायिक आघाडीवर सुद्धा संबंध टिकवू शकाल. ह्या आठवड्यात शक्यतो कोणत्याही बाबतीत कुटुंबियांशी गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. ह्या आठवड्याच्या सुरवातीपासूनच भिन्नलिंगी व्यक्तींप्रती आपणास विशेष आकर्षण राहील. प्रणयी जीवन सुखद असेल. कामाच्या ठिकाणी भिन्नलिंगी मित्रांकडून फायदा होईल. अभ्यास संथ परंतु एकधाऱ्या गतीने पूर्णत्वास गेल्याने दिलासा मिळेल. मातेच्या प्रकृतीची थोडी चिंता निर्माण होईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपणास स्फूर्ती जाणवेल.

मीन-  या आठवड्यात आपणास संबंधात व कामात थोडी काळजी घ्यावी लागेल. शक्यतो नवीन काही न करता आपल्या सद्य स्थितीस यथावत ठेवणे हितावह होईल. व्यापारात किंवा नोकरीत एखादा विशिष्ट टप्पा गाठल्यावर कामात खोळंबा झाल्याने नशिबाची साथ मिळत नसल्याची भावना होईल. ह्या व्यतिरिक्त देशांतर्गत कार्यात व भागीदारी कार्यात आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे असले तरी उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी आपण उत्तम कामगिरी करू शकाल. उत्तरार्ध अनुकूल असल्याने त्या दरम्यान काही लाभ होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात वैचारिक गोंधळ माजल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे लक्ष लागणार नाही. कोणताही निर्णय घेण्यात आपल्या कडून विलंब झाल्याचा परिणाम अभ्यासावर होईल. आध्यात्मिक बाबीत आपली रुची वाढेल. ह्या आठवड्याच्या सुरवातीसच आपल्या कौटुंबिक संबंधातील मर्यादा आपणास समजून घ्याव्या लागतील. वैवाहिक जीवन अधिक सुसह्य होण्यासाठी परिपकवपणा, शांतपणा व संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा विशेष आशास्पद असल्याचे दिसत नाही. आठवड्याच्या मध्यास अनिद्रेमुळे सुद्धा आजारपण येण्याची शक्यता आहे. आपले कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह वाढण्याची शक्यता आहे.