
शास्त्रात अनेक गोष्टी करू नये असे सांगण्यात आले आहे. एवढेच काय तर, आपल्यापैकी अनेकांच्या घरात ज्येष्ठांना सांगताना ऐकले असेल की, जेवताना ताटामध्ये तीन पोळ्या वाढू नये. तसेच प्रसादातही तीन फळं दिली जात नाही.
काय सांगते विज्ञान?
विज्ञानाच्यादृष्टीने अशी कोणतीच मोजदाद नाही, पण सामान्य माणसाला 1 वाटी वरण, भात आणि भाजीसोबत 2 पोळ्या सेवन करणे पुरेसे आहे, पण सामान्य माणसाला एक वाटी वरण, भात आणि भाजीसोबत दोन पोळ्या खाणे पुरेसे आहे, अशा स्थितीत तिसरी पोळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो तसेच आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती असते.
तीन पोळ्या वाढण्याचे तोटे
ज्या व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या वाढल्या जातात. त्या व्यक्तीच्या मनात दुस-यांशी शत्रुत्वाची भावना निर्माण होते. केवळ पोळ्याच नव्हे तर, तीन लाडू, तीन फळे ताटात ठेवू नयेत. असे केल्याने व्यक्तीचे वयही कमी होते.
अशुभ मानला जातो तीन क्रमांक
प्राचीन काळापासून, पूजेच्या ग्रंथात देखील 3 क्रमांक अशुभ मानला गेला आहे. पूजेमध्ये किंवा प्रसादात 3 क्रमांकामध्ये कोणत्याही गोष्टी दिल्या जात नाही.