सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड चवीचे अननस तवा फ्राय
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर अननस उपलब्ध असतात. अननसाचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट गोड चवीचे अननस शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे. अननसापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवलेले जातात. अननस शिरा, कस्टर्ड इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अननस तवा फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अननस तवा फ्राय हा पदार्थ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. आंबट तिखट चवीचा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही झटपट बनवू शकता. बऱ्याचदा अननस खाल्ल्यामुळे शरीरातील उष्ण बाहेरव पडते. ज्यामुळे तोंड येणे, तोंडात बारीक बारीक फोड येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून तुम्ही अननस शिजवून खाऊ शकता. यामुळे त्यातील हानिकारक घटक बाहेर पडून जातील. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये अननस तवा फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ






