चिंचेचं नाव कढल्यानंतर तोंडाला पाणी सुटते? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेची चटणी
आंबटगोड चवीची चिंच खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चिंचेचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. जेवणाच्या ताटात चटणी असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. खोबऱ्याची चटणी, कैरीची चटणी, लसूण चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून चटणी बनवल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चिंच चटणीसोबत गरमागरम भाकरी, चपाती अतिशय सुंदर लागते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पारंपरिक पदार्थ कायमच बनवले जातात. आंबटगोड चवीची चिंच चटणी गूळ, लसूण इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवली जाते. बाजारात चिंच चटणी सहज उपलब्ध होते. पण यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे बऱ्याचदा चटणी खराब होऊन जाते. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरच्या घरी सुद्धा चिंच चटणी बनवू शकता. जाणून घ्या चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार साबुदाणा खिचडी, नेहमीपेक्षा लागेल वेगळी आणि भन्नाट चव






