भूक लागल्याने मनावर नकारात्मक प्रभाव पडतो, तणाव वाढतो आणि मग…

नवीन संशोधनानुसार ,जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा अचानक ग्लुकोजमध्ये घट झाल्यास आपल्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो(Hunger increases stress).

    नवीन संशोधनानुसार ,जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा अचानक ग्लुकोजमध्ये घट झाल्यास आपल्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो(Hunger increases stress).

    याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, “आम्हाला दिसून आले की, ग्लुकोजच्या पातळीतील बदल हे मनावर कायमचा प्रभाव पाडू शकतो.” संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, उंदीरांना ग्लुकोज मेटाबॉलिझम अवरोधक इंजेक्शन देण्यात आला, ज्यामुळे अचानक stressग्लुकोजची पातळी खाली होऊ लागली आणि त्यांना हायपोग्लेसेमियाचा अनुभव येऊ लागला.

    संशोधकांनी हायपोग्लेसेमियाचा अनुभव घेतल्यानंतर उंदीरांच्या रक्त पातळीचे परीक्षण केले. त्यामध्ये अधिक कॉर्टिकोस्टेरॉन आढळले, जे शारीरिक तणावाचे सूचक आहेत. जेव्हा उंदीरांना ग्लुकोज चयापचय अवरोधक दिला गेला तेव्हा उंदीर देखील आळशी दिसू लागले.

    निष्कर्षांवरून हे दिसून येते की, जेव्हा प्राणी हायपोग्लेसेमिया होतात, तेव्हा त्यांना तणाव आणि उदासीन मनाचा अनुभव येतो. “जेव्हा लोक नकारात्मक मनाच्या स्थितीबद्दल आणि तणावाविषयी विचार करतात तेव्हा ते मनोवैज्ञानिक घटकांविषयी विचार करतात. परंतु आम्हाला आढळून आले की खराब खाण्याच्या मानवी वर्तनावर प्रभाव पडतो,” असे संशोधकांनी सांगितले.