
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत असे काही योग असतात ज्यामुळे दांपत्याला जुळ्या मुलांची प्राप्ती होते. जुळी मुलं होण्याच्या या विशेष योगांबद्दल आपण जाणून घेवूया.
- जुळी मुलं होण्याबाबतचे विशेष योग पुढीलप्रमाणे.
- कुंडलीत चंद्र आणि शुक्र ग्रह एकाच राशीत असणे.
- बुध, मंगळ आणि गुरु विषम राशीत असणे.
- लग्न आणि चंद्र समराशीत स्थित असतील. आणि पुरुष ग्रह दृष्टीत असता जुळी संतती प्राप्त होते.
- बुध, मंगळ, गुरु आणि लग्न बलवान असावे तसेच समराशीत असणे.
- मिथुन किंवा धनु राशीमध्ये गुरु-सूर्य असता तसेच बुध ग्रहाची दृष्टी असता जुळी मुल प्राप्त होतात.
- शुक्र, चंद्र, मंगल, कन्या किंवा मीन राशीमध्ये बुध ग्रहाची दृष्टी असता जुळ्या कन्या होतात.
- स्त्रियांच्या कुंडलीत सातव्या स्थानावर राहू असता किंवा गुरु-शुक्र एक साथ असता जुळी मुले जन्मतात. परंतु अशा दांपत्याला ही जुळी संतती विवाहानंतर खूप वर्ष नंतर होतात.