उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर कमी बजेटमधील ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या

भारतामध्ये अनेक सुंदर सुंदर ठिकाण आहेत तिथे आपण फिरायला जाऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यांसारखी अनेक पर्यटन स्थळ आहेत.

  उन्हाळ्याच्या (Summer Vacation) सुट्टीमध्ये अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. काहींना आपल्या कुटुंबासोबत मुलाबाळांसोबत जायचं असतं तर काहींना मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जायचं असत. भारतामध्ये अनेक सुंदर सुंदर ठिकाण आहेत तिथे आपण फिरायला जाऊ शकतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यांसारखी अनेक पर्यटन स्थळ आहेत. पण तुमचे बजेट कमी असेल तरी सुद्धा तुम्ही भारतामधील छान ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता. आज अशाच काही ठिकाणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  मनाली:

  बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यामुळे मनाली शहराची एक वेगळी ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक मनालीमध्ये फिरण्यासाठी जातात. तिथे असलेल्या डोंगरदऱ्या, बर्फ हे तिथले खास वैशिष्ट्य आहे. इथे तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत जाऊन फिरण्याचा आणि वेगवेगळ्या खाद्य पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता. 20 ते 40 हजार रुपयांमध्ये १ आठवडा तुम्ही मनालीमध्ये राहून छान आनंदात घालवू शकता.

  कासोल:

  भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यातील कासोल हे एक गाव आहे. इथे असलेली नयनरम्य दृश्य खूपच रोमांचक आहेत. हिप्पी संस्कृती, विविध प्रकारचे कॅफे, सदाहरित पाइन जंगलात ट्रेकिंग यांसारखी अनेक ठिकाणं इथे फिरण्यासाठी आहेत. कासोल मध्ये जाण्याचे नियोजन करत असाल तर तुम्हाला 15 ते 25 हजार रुपयांमध्ये संपूर्ण ट्रीपची मजा घेता येईल.

  गोकर्ण:

  कर्नाटकमध्ये असलेले स्वच्छ समुद्र किनारे प्राचीन मंदिरे, साहसी सहलींसाठी गोकर्ण हे ठिकाण ओळखले जाते. इथे दरवर्षी वेगवेगळ्या भागातून लाखो पर्यटक समुद्रकिनारा पाहण्यासाठी येतात. गोकर्णामध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता. 5 ते 25000 रुपये मध्ये निवास, भोजन, प्रेक्षणीय स्थळे इत्यादींना भेट देऊन गोकर्णंची ट्रिप तुम्ही एन्जॉय करू शकता.

  शिमला:

  उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेकजण शिमला किंवा मनाली जाण्याचा विचार करतात. इथे असलेले सुंदर हवामान प्रवाशांना पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पडते. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत शिमलामध्ये आलात तर तुम्ही पूर्णपणे या ट्रिपचा आनंद घेऊ शकता. प्रति व्यक्ती सुमारे 12 हजार ते 28 हजार रुपये खर्च होऊ शकतो.