गुडघे दुखीचा त्रास जाणवत असेल तर आल्याचा वापर नक्की करून पाहा

काही वेळेस वाढत्या वयामुळे तर काही लोकांमध्ये पोषक तत्वांचा अभाव, अतिव्यायाम, एखाद्या गोष्टीशी आदळणे किंवा खूप वेळ गुडघे टेकून बसणे यामुळे सांधेदुखी होण्यास सुरुवात होते.

  वयाच्या चाळीशी नंतर गुडघे दुखीचा त्रास महिला आणि पुरुषांना जाणवू लागतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे कोणत्याही वयात आरोग्यासंबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत. काही वेळेस वाढत्या वयामुळे तर काही लोकांमध्ये पोषक तत्वांचा अभाव, अतिव्यायाम, एखाद्या गोष्टीशी आदळणे किंवा खूप वेळ गुडघे टेकून बसणे यामुळे सांधेदुखी होण्यास सुरुवात होते. गुडघे दुखी सुरु झाल्यानंतर नीट उठता येत नाही तर नीट बसता येत नाही. गुडघे दुखीपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आल्याचे सेवन करून गुडघे दुखी कमी करू शकता. आल्याची ही रेसिपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आल्यामध्ये असेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे वेदना कमी होऊन आराम मिळतो. गुडघेदुखीपासून आराम मिळवून देणारे घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया..

  गुडघे दुखीवर घरगुती उपाय:

  आल्याचा चहा:

  आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याने आल्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. आल्याचा चहा रोज सकाळी बनवून पिल्याने गुडघे दुखी संबंधित अनेक समस्या दूर होतात. आल्याचा चहा बनवण्यासाठी एका टोपामध्ये १ छोटा ग्लास पाणी घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आल्याचे तुकडे घालून ते उकळण्यासाठी ठेवा. त्यानंतर ५ मिनिटांनी गॅस बंद करून चहा गाळून घ्या. हा चहा तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक सिप पिऊ शकता. यामुळे गुडघे दुखी कमी होईल.

  मोहरी तेल:

  मोहरीच्या तेलाचा वापर जसा जेवणाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो तसाच वापर आरोग्यासंबंधित समस्या दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. सांधेदुखी कमी करण्यासाठी सेलेरी मोहरीच्या तेलात शिजवून गुडघ्यांना लावल्याने गुडघे दुखी कमी होण्यास मदत होते. मोहरीच्या तेलाने मॉलिश केल्यानंतर गुडघे दुखी कमी होईल. गुडघे दुखीचा वेदना जास्तच जाणवत असतील तर सेलेरीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्यादिवशी हे पाणी गरम करून पिल्याने गुडघे दुखीवर आराम मिळेल.

  लसूण:

  लसणीमध्ये जळजळ-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. गुडघे दुखीची समस्या जास्तच वाढत चालली असेल तर एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात लसणाच्या काही पाकळ्या टाकून शिजवून घ्या. त्यानंतर हे तेल गुडघ्यांना लावा. यामुळे सांधेदुखी कमी होईल.