सतत रडत असाल तर होऊ शकते त्वचा खराब, पसरतील ब्लड वेसल्स कसे ते घ्या जाणून

सतत रडत राहिल्याने त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. रडण्यामुळे नाक, चेहरा आणि डोळ्यांजवळील रक्तवाहिन्या पसरत जातात. त्यामुळे चेहऱ्याला सूज येणे, लालसरपणा वाढू लागणे यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात.

  रडणं ही एक जैविक प्रक्रिया आहे. पण सतत रडत राहिल्याने मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. अनेकांना छोट्या मोठ्या कारणावरून सतत रडायला येत. पण रडल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. अनेकदा घरातील अंतर्गत वादामुळे आपण चिडतो त्यानंतर वाद घालणे आणि रडणे. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. पण सतत रडत राहिल्याने मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. सतत रडत राहिल्याने त्वचेसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया सतत रडत राहिल्याने त्वचेसंबंधित कोणत्या समस्या निर्माण होतात.

  सतत रडत राहिल्याने त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. रडण्यामुळे नाक, चेहरा आणि डोळ्यांजवळील रक्तवाहिन्या पसरत जातात. त्यामुळे चेहऱ्याला सूज येणे, लालसरपणा वाढू लागणे यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. त्वचेची पीएच पातळी म्हणजेच संभाव्य हायड्रोजन असंतुलित होत जाते. त्यामुळे रडल्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवून मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. अश्रू हे इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असतात त्यामुळे त्यांना खारट चव असते. इलेक्ट्रोलाइट्स हा शरीरासाठी महत्वपूर्ण खजिना आहे. यामुळे ते शारीरिक क्रियाकलापांमध्ये उपयुक्त ठरते. रडणे, घाम येणे आणि लघवी करताना इलेक्ट्रोलाइट्स नष्ट होऊन जातात. त्यामुळे दररोज ६ ते ७ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

  सतत रडल्याने त्वचेचे काय नुकसान होते:

  ब्रेकआउटचा धोका

  सतत रडत असताना अश्रू पुसण्यासाठी चाबका आणि रुमाल वापरल्याने त्वचा फुटू लागते. यामुळे त्वचेवर मुरूम किंवा फोड येण्याची शक्यता असते. तसेच त्वचेवरील संक्रमण वाढू लागते. त्यामुळे अश्रू पुसत असताना हळुवार हाताने रुमालाने डोळे पुसा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

  सेबम उत्पादनात वाढ

  वारंवार रडत राहिल्याने सेबम उत्पादनात वाढ होते. यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढत जाते. त्वचेतील सेबम ग्रंथी जलद काम करून त्वचेवर तेलाचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे अनेकदा महिलांना मुरूम किंवा फोड यांचा सामना करावा लागतो.

  चेहऱ्यावर सूज येणे

  मानसिक तणाव दूर करण्यासाठी रडणे फार आवश्यक आहे. सतत रडत राहिल्याने चेहऱ्याच्या रक्तवाहिन्या पसरू लागतात. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला आणि नाक आणि ओठांच्या जवळ सूज येते. जळजळ काढून टाकण्यासाठी सतत रडणे टाळले पाहिजे.

  त्वचेचे निर्जलीकरण

  बराच वेळ रडत राहिल्याने त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. रडल्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आराम मिळवण्यासाठी नियमित पाणी प्या आणि मॉइश्चरायझर लावा. त्वचा हायड्रेट राहून त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो. तसेच जळजळ, खाज कमी होते.