दररोज पांढरा भात खात असाल तर ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…

बरेच लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये पांढरा भात खात असतात. पण आता याबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. दररोज पांढरा भात खाणे तुमच्या शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

    मुंबई : अनेकजण पांढरा भात खातात. पांढरा भात हा आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर तेही आहे सोपं, खालील माहिती जाणून घ्या त्याबाबत…

     आरोग्य कसे बिघडू शकते?

    जर तुम्ही दररोज पांढरा भात खात असाल तर तुमचे वजन वाढण्याची देखील शक्यता असते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे, अशा लोकांनी पांढरा भात खाणे टाळावे. त्याचबरोबर मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे शक्यतो महिन्यातून एकदाच भात खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही मेटाबॉलिक समस्या टाळू शकता.

    हृदयविकाराचा धोका वाढेल –

    तांदळामध्ये शरीरासाठी आवश्यक असे कोणतेही पोषक घटक नसतात. त्यामुळे दररोज भात खाणे टाळा. माहितीनुसार, अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित जानेवारी २०१५ च्या विश्लेषणात असे आढळून आले आहे की, जास्त भात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे पांढरा भात खाणे शक्यतो टाळावे नाहीतर तुमच्या शरीरावर याचे खूप वाईट परिणाम होतील.