घराच्या भिंतीवर या गोष्टी दिसल्या तर दुर्लक्ष नको! नक्की वाचा

  कोणत्या ठिकाणी काय, कसे ठेवावे याबरोबरच भिंतींविषयी सुध्दा बऱ्याच गोष्टी वास्तूशास्त्रात (Architecture) सांगितल्या आहेत. घराच्या भिंती खराब असल्याने नकारात्मकता वाढते. घरात फिकट व चांगले रंग लावायला हवेत. वास्तूशास्त्रात घरात ठेवली जाणरी प्रत्येक वस्तूची दशा आणि दिशा कशी असावी या विषयी सांगितले आहे. याचे फार महत्व आहे. असे मानले जाते की घरातल्या (home) वस्तू वास्तूशास्त्रानुसार ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

  जशा घरातल्या वस्तू आपल्या वास्तूवर प्रभाव पाडतात तसाच भिंती (wall) व दरवाजे (door) घरातल्या (home)
  माणसांवर वाईट परीणाम करतात. असे मानले जाते की काही संकेत हे घराच्या भिंतींशी निगडीत आहेत. ज्यामुळे घरातील सुख शांतीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून घराच्या भिंती कायम सुस्थितीत व सुसज्ज असाव्यात.

  वास्तूशास्त्रात (Architecture) भिंत कोणत्या दिशेला हवी याचा उल्लेख सापडतो. घर बनवताना भिंतींची उंची दरवाज्यापेक्षा तीन चतुर्थांश अधिक असायला हवी.वास्तूशास्त्रानुसार घराच्या पश्चिम व दक्षिण (West and South)दिशेच्या भिंतींची उंची उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतींच्या तुलनेत कमीतकमी ३० सेंटीमीटर अधिक असायला हवी.

  वास्तूशास्त्रानुसार घराच्या (home) भिंती नेहमी स्वच्छ ठेवायला हव्यात. असे मानले जाते की, जाळे लागलेल्या भिंती, धुळ जमलेल्या मळकट भिंती नकारात्मक ऊर्जा वाढवतात. भिंतींवरील जाळी घरात तणावपुर्ण व निराशात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच भिंतींवर कसलेच डाग नसावे यामुळे घरात दरीद्री वाढते.

  वास्तूशास्त्रानुसार घरातील भिंतींच्या रंगांचे विशेष महत्व आहे. त्यामुळे भिंतींवरील रंगांचे पोपडे धरलेले नसावे. यामुळे घरात अनेक आजारपण येतात. याबरोबर घरातील भिंतींवर नेव्ही ब्ल्यू किंवा काळा रंग लावू नये. घराला आतल्या बाजूने कायम फिकट आणि सुंदर (beauty) रंग (color) लावावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील सदस्यांमध्ये प्रेम (love) व सद्भावना वाढते.