वाढत्या उष्णतेवर मात करायची असेल तर प्या ‘या’ फळांचा ज्यूस, शरीराला मिळेल थंडावा

मागील काही दिवसांमध्ये राज्यात भरात उन्हाचा चांगलंच वाढला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असल्याने काही भागांमध्ये थंडावा निर्माण झाला आहे.

  मागील काही दिवसांमध्ये राज्यात भरात उन्हाचा चांगलंच वाढला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असल्याने काही भागांमध्ये थंडावा निर्माण झाला आहे. मात्र या बदलत्या वातावरणाचा प्रभाव आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. एप्रिल मे महिन्यात उन्हाचा पार आणखीन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेवर मात करण्यासाठी आपण थंड पेय किंवा थंड पाणी पितो. ,मात्र यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उष्णतेपासून वाचण्यासाठी तुमच्या आहारात काही फळांचे देखील सेवन करू शकता. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होईल. फळांमध्ये भरपुर पाणी असते. उष्णतेपासून वाचण्यासाठी तुम्ही फळांचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होईल. पोटाला थंडावा मिळेल आणि शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.

  कोल्डड्रिंक्स किंवा पॅकेजिंगमध्ये असलेले थंड पेय पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस आरोग्यासाठी चांगला असतो. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहून पोटाला थंडावा मिळतो. उष्णतेपासून वाचण्यासाठी इतर थंड पेय पिण्यापेक्षा तुम्ही फळांचा ज्युस पिऊ शकता. तसेच आम्ही तुम्हाला अश्याच काही फळांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा ज्यूस पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

  आंब्याचा ज्यूस

  उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याची अवाक केली जाते. आंबा तुम्ही कापून सुद्धा खाऊ शकता. आंबा खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि पोटाला थंडावा मिळतो. आंबा खाण्यासोबतच अनेकांना मॅगो मिल्कशेक किंवा मॅंगो ज्यूस देखील प्यायला आवडतो. यामध्ये पुरेशा प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्वे आढळून येतात. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आंब्याचा ज्यूस मदत करतो.

  बेरीजचा ज्यूस

  बाजारात अनेक प्रकारच्या बेरीज उपलब्ध असतात. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी यांसारख्या अनेक बेरीजचे ज्यूस बाजारामध्ये मिळतात. उन्हाळ्यात बेरीजचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या ज्यूसमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बेरीजमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. बेरीजचा ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

  कलिंगडाचा ज्यूस

  उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे कलिंगड ला ‘बॉडी हिलिंग फ्रूट’ असे देखील म्हटले जाते. कलिंगडाच्या ज्यूस ऐवजी तुम्ही कलिंगड नुसतेच कापून देखील खाऊ शकता. रोजच्या आहारात कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी भरून निघण्यास मदत होते.