उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर घरी बनवा काकडी पुदिना ड्रिंक

उन्हाळा ऋतूला नुकतीच सुरुवात झाली. सगळीकडे तापमानात चांगलीच वाढ झाली. या वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो.

  उन्हाळा ऋतूला नुकतीच सुरुवात झाली. सगळीकडे तापमानात चांगलीच वाढ झाली. या वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्य संबंधित अनेक समस्या वाढू लागतात. यातील सगळ्यात सामान्य समस्या म्हणजे डिहायड्रेशन.प्रत्येकाला उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या जाणवते. शरीरामध्ये पाण्याची कमतरता कमी झाली की शरीर डिहायड्रेड होण्यास सुरुवात होते. अनेकदा डिहायड्रेशन ही समस्या तुमच्या शरीरावर बेतू शकते. शरीरातील डिहायड्रेशनची समस्या रोखण्यासाठी आहारासोबतच तुम्ही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. अश्यावेळी तुम्ही काकडी पुदिन्याचे ड्रिंक बनवू शकता.

  काकडी पुदिन्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. शरीरात पाण्याची पातळी कमी झाली की डिहायड्रेशनची समस्या जाणवते. अश्यावेळी तुम्ही पाण्यासोबत वेगवेगळ्या फळांचे ज्यूस देखील पिऊ शकता. काकडीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे काकडी खाल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच पुदिना शरीराला थंड असतो. उन्हाळ्यात जास्तीत जास्त थंड पदार्थ खाल्ले जातात. काकडी पुदिन्याचा रस पिल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहील.

  चला तर पाहुयात काकडी पुदिन्याचे ड्रिंक कसे बनवतात.

  साहित्य:-
  काकडी १,पुदिन्याची पाने ४-५,काळे मीठ,आवश्यकतेनुसार मीठ, लिंबाचा रस

  कृती:-

  सर्वप्रथम काकडी पुदिन्याचे ड्रिंक बनवण्यासाठी काकडी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर काकडीचे बारीक गोल तुकडे करून घ्या. हे तुकडे पातळ कापून घ्या.त्यानंतर पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. पाने चिरून झाल्यानंतर मिक्सरमधून काकडी आणि पुदिन्याची पाने बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्या मिश्रणात थोडं पाणी घालून पुन्हा बारीक करा. बारीक झाल्यानंतर चाळणीमधून काकडी-पुदिन्याचे मिश्रण गाळून घ्या. नंतर एका ग्लासमध्ये काकडी आणि पुदिन्याचा रस काढून त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास यावर तुम्ही काकडी आणि पुदिन्याची पाने लावून सजवू शकता. तयार आहे काकडी पुदिन्याचे हायड्रेटिंग ड्रिंक.