उन्हाळ्यात चेहरा टॅन झाला असेल तर ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा, चेहऱ्यावर दिसले चमक

सध्या सगळीकडे उन्हाळा हा ऋतू सुरु आहे. साधारणता मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात होते. या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. आरोग्यासंबंधित अनेक समस्या या दिवसांमध्ये जाणवू लागतात.

  सध्या सगळीकडे उन्हाळा हा ऋतू सुरु आहे. साधारणता मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात होते. या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. आरोग्यासंबंधित अनेक समस्या या दिवसांमध्ये जाणवू लागतात. मात्र या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. महिलांनी त्वचेची जास्त काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात महिलांनी चेहऱ्याला सनस्क्रिन लावले पाहिजे.

  सनस्क्रिनचा वापर केल्याने चेहरा टॅनिंग होण्यापासून रोखला जातो. घाईगडबडीच्या वेळी सनस्क्रिन लावून बाहेर गेल्यानंतर त्वचेचे उन्हापासून रक्षण होते. उन्हाळ्यात बाहेर जाताना त्वचेला स्कार्फ बांधून बाहेर गेले पाहिजे यामुळे त्वचा टॅनिंग होत नाही. जर त्वचा व्यवस्थित झाकली गेली नाही तर त्वचा खराब आणि टॅनिंग होण्याचे प्रमाण वाढते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा महागड्या क्रिम किंवा इतर कोणत्याही केमिकल क्रीम्सचा वापर करतो. पण याचा वापर जास्त वेळ राहत नाही. अश्यावेळी तुम्ही घराच्या घरी कोरफडचा फेस पॅक लावून टॅनिंग दूर करू शकता. कोरफडचा जेल चेहऱ्यासाठी प्रभावी आहे. यामुळे त्वचेसंदर्भातील अनेक समस्या दूर होतात.चला तर पाहुयात कोरफडपासून घरच्या घरी फेक पॅक कसा बनवतात.

  कोरफड जेल आणि लिंबाचा फेसपॅक

  कोरफड आणि लिंबाच्या रसाचा वापर चेहऱ्याला केल्याने टॅनिंग कमी करता येते. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होते. कोरफडीमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो तर लिंबाचा रस वापरल्याने चेहऱ्यातील टॅनिंग दूर होऊन चेहरा ग्लो करतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये कोरफड जेल किंवा कोरफडचा गर घ्या. त्यामध्ये २ ते ३ चमचे लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण मिक्स करून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला लावा. १५ मिनिट झाल्यानंतर फेसपॅक हाताने चोळून मी=नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होईल.

  कोरफड जेल आणि गुलाबपाणी फेसपॅक

  कोरफड आणि गुलाबजलचा फेसपॅक बनवण्यासाठी अगदी सोपा आहे. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होऊन चेहरा फ्रेश दिसू लागेल. फेसपॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे कोरफड जेल आणि २ चमचे गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला १५ मिनिट लावून ठेवा. त्यानंतर हातावर थोडं पाणी घेऊन चेहऱ्यावर मसाज करा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.