‘हे’ अन्न पदार्थ २०५० मध्ये तुम्हाला नव्याने खायला मिळणार 

    “जगभरातील लोक अनेक प्रकारच्या वनस्पती खातात आणि भविष्यातील अन्नपुरवठ्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी याच वनस्पती उपयुक्त ठरणार आहेत.”, असे ते म्हणाले. जगभरात ७००० प्रकारची धान्ये खाल्ली जातात. त्यापैकी केवळ ४१७ प्रजाती आपण पिकवतो. पण भविष्यातील (future) आहार काय असेल?

    पँडनस हे एक छोटेसे झाड असते. हे झाड पॅसिफिक बेटांपासून (Pacific Islands)फिलिपाइन्सपर्यंत किनारपट्टीच्या (coast)भागात हे आढळून येते. आग्नेय आशियामधील वाळवंटांमध्ये याची पाने वापरतात आणि याची दाण्यासारखी दिसणारी फळे कच्ची खातात येतात किंवा शिजवूनही खाता येतात. “ही वनस्पती दुष्काळ, वादळ आणि आम्लयुक्त  (Drought, storm, acidic)पावसातही टिकून राहू शकते. हा एक सकस आहार आहे आणि वातावरणीय बदलांमध्येही ही वनस्पती तग धरू शकते आणि ती रुचकरही आहे.”, असे ते म्हणाले. गोमेझ म्हणाले, पँडलम शाश्वत पद्धतीने वापरता आले तर त्याची व्याप्ती इतरही भागांमध्ये वाढविता येऊ शकेल. गेडागुडीसुद्धा भविष्यातील एक अन्न आहे. हे जिन्नस द्विदल धान्ये, मसूर आणि नट्स या प्रजातीतील आहे. त्याची किंमत स्वस्त असते, त्यात प्रथिने आणि बी जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. किनारपट्टीच्या भागातील पठारावर किंवा सड्यावरील वातावरण यासाठी अनुकूल असते. जगभरात मसूर आणि नट्सचे (दाण्यांचे) २०००० हून अधिक प्रकार आहेत. पण त्यापैकी आपण केवळ काही प्रकारच खाण्यासाठी वापरतो. शास्त्रज्ञांना यापैकी काही जंगली प्रजातीच माहीत आहेत.

    बोट्सवाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागात मोरामा नावाचा दाणे उकडून खातात किंवा मक्यासोबत दळतात. सर्वच प्रकारचे दाणे खाण्यासारखे नसतात, पण वेगवेगळ्या प्रजातीची तपासणी करून पोषक आणि खाद्य प्रजाती शोधण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. जगभरात १०,००० प्रकारची धान्ये आहेत आणि यातून नवीन अन्नधान्यांचा शोध लागू शकतो, अशी शास्त्रज्ञांची धारणा आहे. एन्सेटला बनावट केळं असंही म्हणतात कारण केळ्याचा हा प्रकार फक्त इथिओपियामध्येच खाल्ला जातो. हे केळ्यासारखे फळ खाता येऊ शकते. त्याच्या खोडाचा आणि मुळांचा वापर ब्रेडसारखे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. उष्ण वातावरणात वाढणारे हे फळ नजीकच्या भविष्यात १० कोटी लोकांना अन्न पुरवू शकतं, असं अभ्यासांती दिसून आलं आहे. इथियोपियाच्या बाहेर या वनस्पतीबद्दल फारशी माहिती नाही. तिथे या वनस्पतीची देठं खिचडी आणि पोळी बनवण्यासाठी वापरली जातात.