मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी आहारात करा 3 प्रकारच्या व्हेज सूपाचा समावेश

कोणत्याही वयात मधुमेहाचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे आहारामध्ये योग्य त्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. पौष्टिक फळे भाज्या, कडधान्य आणि इतर पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित राहतो.

  बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वाढत चालेल्या आजारांमध्ये मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. मधुमेह झाल्यानंतर पथ्य न केल्यास रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.कोणत्याही वयात मधुमेहाचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे आहारामध्ये योग्य त्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. पौष्टिक फळे भाज्या, कडधान्य आणि इतर पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित राहतो. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी आहारामध्ये मांसाहारी पदार्थ खात असताना लाल रंगाचे मासे खाऊ नये. हे मासे मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासारखे आहेत. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत जाते. त्यामुळे आहारात भाज्या, फळे यांचे जास्त सेवन केले पाहिजे. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ व्हेज सूपाचा समावेश करा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.

  टोमॅटो सूप:

  टोमॅटोमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो उकडून घ्या. टोमॅटो उकडून झाल्यानंतर थंड करून त्याची प्युरी करा. नंतर एका टोपामध्ये टोमॅटो प्युरी घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून गॅस चालू करा. सूपला उकळी आल्यानंतर त्यात लाल तिखट, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि साखर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोमॅटो सूप. हे सूप तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा बनवून पिऊ शकता.

  लाल मसूर सूप:

  जेवणात डाळ बनवताना आपण अनेकदा घरी मसूरची डाळ बनवतो. पण या डाळीपासून बनवलेले सूप तुम्ही कधी खालले आहे का? चला तर पाहुयात याची रेसिपी. मसूर डाळीचे सूप बनवण्यासाठी कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुतलेली मसूर डाळ, कांदा, टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ, गाजर, शिमला मिरची हे सर्व घालून कुकरच्या ६ ते ७ शिट्या काढून घ्या. सूप पूर्णपणे शिजल्यानंतर मिक्स करून वाडग्यात सर्व्ह करा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता.

  मशरूम सूप:

  मशरूम सूप बनवण्यासाठी एक कप मशरूम, एक चमचा गव्हाचे पीठ, अर्धा कप लो फॅट दूध, अर्धा कप चिरलेला कांदा, एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घ्या. त्यानंतर गॅसवर पॅन गरम करून त्यात तेल टाका. तेल टाकल्यानंतर त्यात कांदा टाकून नीट भाजून घ्या. नंतर त्यात एक कप मशरूम आणि भाजलेला कांदा, चवीनुसार मीठ टाकून ते पाण्यात शिजवून घ्या. ७ ते ८ मिनिटं शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या. नंतर त्यात दूध घालून पुन्हा एकदा मिक्स करा. एका कढईत तेल घालून हे मिश्रण मंद आचेवर शिजवून गॅस बंद करून सर्व्ह करा.