हिवाळ्यात करा आपल्या आहारामध्ये जवसाच्या चटणीचा समावेश; शरीरासाठी अत्यंत उपयुक्त

    पौष्टिक अशा जवसची खमंग चटणी कशी करायची याची सविस्तर रेसिपी जाणून घ्या

    साहित्यः

    •  दिड वाटी जवस
    •  अर्धा वाटी तिळ
    • कढीपत्ता
    •  वाळलेल्या लाल मिरच्या चार ते पाच
    •  जिरे
    •  मीठ
    • लसूण
    •  तेल

     

    कृती

    • सर्वप्रथम एका लोखंडी कढईत थोडया तेलात लाल मिरच्या लसूण आणि कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा.
    • त्याच तेलात नंतळ जवस परतून हलकीशी परतून घ्यावी. थोडा खमंग सुवास आला की त्यात तीळ घालून मंद आचेवर तीळ आणि जवस भाजून घ्यावे.
    • भाजलेले जवस आणि तीळ थोडे गार झाले की त्यात मीठ, जिरे व तळलेल्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता घालून मिक्सरमधून फिरवून घेणे किंवा खलबत्त्यात चटणी कुटून घ्यावी.
    • अशा रितीने खमंग जवसाची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही हिवाळ्यात गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता. सोबतीला ओल्या कांद्याची पात असल्यास अजून मजा येईल.