उन्हाळ्यात गर्मीपासून वाचण्यासाठी आहारात करा कांद्याचा समावेश, जाणून घ्या फायदे

उन्हाळा सुरु झाल्यानंतर आहारामध्ये मुख्यता बदल करून थंड पदार्थांचे जास्त सेवन केले जाते. थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.

  राज्यभरात सगळीकडे कडक उन्हाळा चालू असल्याने शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर आहारामध्ये मुख्यता बदल करून थंड पदार्थांचे जास्त सेवन केले जाते. थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.

  दैनंदिन जीवनात आपण आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो. यामुळे पदार्थाची चव वाढते. पण जेवणाच्या पदार्थांमध्ये असा एका पदार्थ आहे ज्यामुळे जेवणाची चव तर वाढतेच पण आरोग्यासाठीसुद्धा आहे फायदे होतात. तो पदार्थ म्हणजे कांदा. कांदा जेवण बनवण्यासाठी वापरला जातो तर जेवणासोबत असाच देखील खाल्ला जातो.कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांद्याचे सेवन केल्याने शरीराला काय फायदे होतात जाणून घेऊया..

  उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे?

  • उन्हाळ्यामध्ये उष्माघाताने अनेक लोक आजारी पडतात, अशा परिस्थितीत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कच्चा कांदा खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कच्चा कांदा खावा.
  • कडक सूर्यप्रकाश किंवा उष्णता वाढल्यास शरीराला थंड ठेवण्याचे काम कांदा करतो. तसेच यामुळे उष्माघातापासून बचाव होतो.
  • कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन बी यांच्यासह अनेक पोषक घटक आढळून येतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-एलर्जिक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात.
  • उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या रसासोबत कांदा खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि पोटासंबंधित अनेक समस्या कमी होतात.
  • कांद्यामध्ये सल्फर आणि क्वेर्सिटीन आढळून येतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहून ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो.
  • कांद्यामध्ये आढळून येणारे अँकार्सिनोजेनिक गुणधर्मामुळे शरीरासाठी औषधांप्रमाणे काम करतात. तसेच कांद्यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे बीपी पातळी कमी होण्यास मदत होते.
  • कांद्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. कांदा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे जेवणाच्या सर्वच पदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो.
  • उन्हाळ्यात आहारामध्ये कांद्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीर निरोगी राहते.