high-protein-fruits

मागील अनेक वर्षांपासून लठ्ठपणा ही समस्या अनेकांना जाणवत आहे. वजन वाढल्यानंतर शरीरातील फॅटचे प्रमाण वाढत जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.

  बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. अवेळी जेवणे, आरोग्याची नीट काळजी न घेणे यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. फास्टफूडचे वाढते सेवन, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. मागील अनेक वर्षांपासून लठ्ठपणा ही समस्या अनेकांना जाणवत आहे. वजन वाढल्यानंतर शरीरातील फॅटचे प्रमाण वाढत जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.

  वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम या सगळ्याची मदत घेतली जाते. व्यायाम केल्याने हळूहळू वजन कमी होते. व्यायामाचा लवकर शरीरावर परिणाम दिसून येत नाही म्हणून अनेकजण महागडे डाएटिंग, उपवास इत्यादी गोष्टी करतात. मात्र या सगळ्याची काही गरज नसते. जर तुम्ही तुमच्या आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश केला तर तुमचे वजन कमी होऊ शकते. आहारात हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आणि व्यायाम करून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.

  वजन कमी करण्यासाठी अनेकदा गोळ्या देखील खाल्ल्या जातात. मात्र या गोळ्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशावेळी आहारात काही फळांचा समावेश केल्याने वजन कमी होते. ही फळे आरोग्यासाठी अतिशय चांगली मानली जातात. या फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वजन कमी करण्यासाठी आहारात या फळांचा समावेश केला पाहिजे. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती फळे.

  किवी (Kiwi)

  किवी हे फळ बाजारामध्ये वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असते. मात्र उन्हाळ्यात हे फळ सार्वधिक बाजारांमध्ये असते. यामध्ये खूप कमी साखर असते. तसेच व्हिटॅमीन सी चे प्रमाण भरपूर असते. किवी पोटाच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या फळाचे सेवन केल्याने चयापचयाची क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते.

  संत्रा (Orange)

  संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने हे फळ उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी खाल्ले जाते. उन्हाळ्यात संत्र्याचे सेवन केल्याने वजन कमी होऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण कमी असते.

  कलिंगड(Watermelon)

  उन्हाळ्यात बाजारामध्ये कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. कलिंगडचे सेवन केल्याने वजन कमी होते. यामध्ये ९०% पाणी असते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. कलिंगडमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. वजन कमी करण्यासाठी कलिंगड अतिशय गुणकारी आहे. कलिंगडाचे सेवन केल्याने लवकर पोट भरते आणि वजन कमी होण्यास मदत होते.