उन्हाळ्यात झटपट बनवा आंबट गोड कैरीची चटणी, जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध होतात. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर आंबे बाजारामध्ये येतात. कोकणातल्या हापूस आंब्याला भारतासह विदेशात देखील मोठी मागणी आहे.

  उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध होतात. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर आंबे बाजारामध्ये येतात. कोकणातल्या हापूस आंब्याला भारतासह विदेशात देखील मोठी मागणी आहे.अनेकांना पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी खायला जास्त आवडते. कैरीपासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात. यामध्ये कैरीचे लोणचं, कैरीचे पन्ह यांसारखे कैरीपासून बनवलेले सर्वच पदार्थ सगळे आवडीने खातात. कैरी खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कैरी खाल्ल्याने द्धकोष्ठता, ऍसिडिटी ,मळमळ यांसारख्या समस्या कमी होतात. तसेच दात मजबूत राहून तोंडाची दुर्गंधी निघून जाते. मात्र काहींना कच्ची कैरी खायला जास्त आवडत नाही. अशावेळी आपण कैरीपासून चटणी देखील बनवू शकतो. अगदी सोप्या पद्धतीमध्ये कैरीची चटणी कशी बनवतात याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  साहित्य:- 

  १ वाटी कैरीचा कीस
  गूळ
  ओलं खोबर ( किसलेले)
  २ हिरव्या मिरच्या
  थोडी कोथिंबीर
  ३-४ कडीपत्याची पाने
  मीठ (चवीनुसार)

  कृती:-

  सर्वप्रथम कैरीची चटणी बनवण्यासाठी बाजारातून कैरी आणून ती स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कैरीची साल काढून कैरी नीट किसून घ्या. कैरी किसून झाल्यावर १ वाटी नारळाचे ओले खोबरे किसून घ्या. खोबर किसून झाल्यानंतर मिक्सरच भांड घेऊन त्यात किसलेली कैरी, खोबर, २हिरव्या मिरच्या, चवीनुसार गूळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, ३ ते ४ कढीपत्त्याची पाने हे सर्व एकत्र करून बारीक वाटून घ्या. त्यामध्ये तुम्हाला वाटल्यास गरजेनुसार पाणी घाला. ही चटणी जाड बारीकसुद्धा वाटू शकता. यामुळे कैरीच्या चटणीची चव अजून सुंदर लागेल. मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर तयार हे कैरीची चटणी. ही चटणी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.