झटपट घरच्या घरी बनवा आंबट गोड आंब्याचा रायता

एप्रिल मे महिना सुरु झाल्यानंतर सगळ्यांना कोकणातील हापूस आंबे खाण्याची इच्छा होते.उन्हाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमणावर आंबे उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबट गोड आंबा खायला आवडतो.

    एप्रिल मे महिना सुरु झाल्यानंतर सगळ्यांना कोकणातील हापूस आंबे खाण्याची इच्छा होते.उन्हाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमणावर आंबे उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबट गोड आंबा खायला आवडतो. घरी आपण आंब्यांपासून छान छान पदार्थ बनवू शकतो. कच्च्या आंब्यांपासून आपण कैरीचे लोणचं, पन्ह, कैरीचे सरबत, मुरंबा इत्यादी पदार्थ बनवू शकतो तसेच पदार्थ पिकलेल्या आंब्यापासून देखील बनवता येतात. असाच एक पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोकणात प्रामुख्याने या दिवसांमध्ये पिक्या आंब्याचे रायते बनवले जाते. हे रयत तुम्ही कलमाच्या, हापूस,तोतापुरी किंवा इतर पिकलेल्या कोणत्याही आंब्यापासून नाही तर रायवळ आंब्यांपासून बनवला जातो. हा आंबा बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो. चला तर पाहुयात आंब्याच्या रायत्याची रेसिपी..

    साहित्य:-

    ३ किंवा ४ रायवळ आंबे, मोहरी, मीठ,गूळ,तेल,हिंग,कडीपत्ता,लसुण,तिखट मसाला

    कृती:-

    सर्वप्रथम आंब्याचा रायता बनवण्यासाठी रायवळ आंबे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे आंबे १० ते १५ मिनिट उकडण्यासाठी ठेवा. आंबे उकडून थंड करून घ्या. आंबे थंड झाल्यावर त्याची साल काढा. त्यानंतर रयत बनवण्यासाठी एका टोपामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून भाजून घ्या. नंतर हिंग, लसूण, कढीपत्ता टाकून फोडणी चांगली भाजून घ्या. त्यानंतर त्यात तिखट ,मसाला टाका. नंतर साल काढून घेतलेले रायवळ आंबे टाकून चमच्याने नीट मिक्स करून घ्या. नंतर त्यात मीठ टाका. एक वाफ आल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेले गूळ टाकून नीट शिजवून घ्या. आंबे उकडलेले असल्याने त्यात आवश्यतेनुसार पाणी टाकावे. जास्त पाणी टाकू नये. एका वाफ काढल्यानंतर तयार आहे आंब्याचा रायता.