pranayam

आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ आला आहे (International Yoga Day 2022) त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला काही अशा योगासनांची आणि प्राणायामांची माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी खूप वाढते.

  योगासने केल्यामुळे मानसिक संतुलन तर नीट राहतेच शिवाय आरोग्यालाही अनेक फायदे होतात. कोरोना काळात ऑक्सिजनअभावी (Oxygen) अनेकांचा मृत्यू झाला हे आपण बघितले. त्यावेळी योगासनांच्या मदतीने शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. अनेकांची योगासनांच्या (Yoga) मदतीने रोगावर मात केली. आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ आला आहे (International Yoga Day 2022) त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला काही अशा योगासनांची आणि प्राणायामांची माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी खूप वाढते.

  या क्रियांमुळे वाढेल ऑक्सिजनची पातळी
  कपालभाति
  ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी कपालभाती प्राणायाम खूप उपयुक्त आहे. तुमच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी कपालभाती प्राणायाम करायलाच हवा. असे केल्याने तुमची ऑक्सिजनची पातळी कायम योग्य राहील. कपालभाती करण्यासाठी सगळ्यात आधी दिर्घ श्वास घ्या. नंतर हळुहळू श्वास बाहेर सोडा. कोरोना रुग्णांनी हे लक्षात ठेवावे की श्वास सोडताना तुमच्यावर कोणताही ताण येऊन देऊ नका. पण जर तुम्ही निरोगी असाल तर व्यवस्थित कपालभाती प्राणायाम करा.

  अनुलोम विलोम
  अनुलोम विलोम ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. अनुलोम विलोममध्ये एक नाकपुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडतात. ज्या नाकपुडीने श्वास सोडलाय त्याच नाकपुडीने तो आत घ्यावा. दोन्ही बाजूंनी ही क्रिया करावी. अनुलोम विलोममुळे टेन्शनसुद्धा दूर होतात.

  साई
  या प्राणायामामध्ये सगळ्यात आधी नाकाने जास्तीत जास्त श्वास आत घेऊन श्वास सोडताना पाउट करायचं आहे. चोचीसारखा ओठांचा आकार करायचा आहे. नंतर ‘हा’आवाज करत श्वास बाहेर सोडायचा आहे. यामुळे टेन्शन दूर होतील. एका वेळी ३५ ते ४० वेळा ही क्रिया करावी. दिवसभरात ५ ते ६ वेळा असे सेट्स करायला हवे. हे प्राणायाम रोज केल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसतील.

  प्रोनिंग
  श्वासोच्छवास नीट व्हावा म्हणून प्रोनिंग एक शास्त्रीय प्रकार आहे. तज्ञांच्या मते जर कुणाची ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी ही क्रिया करावी. पोटावर झोपून दिर्घ श्वासोच्छवास क्रिया करा. तुम्हाला प्रोनिंग पोजिशनमध्ये झोपायचं आहे. त्यामुळे फुफ्फुसे नीट काम करतात. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत सुधारणा होते.