तुमचा एसी गार हवा देत नाहीये का? घराच्या घरी जाणून घ्या कारणं

काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घरातील एसी ठीक करू शकता आणि तो थंड का होत नाही हे जाणून घेऊ शकता

    सध्या कडक उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे फॅन, कुलर आणि एसी याचा वापर वाढला आहे. सध्या अनेकांची पसंती एसीला असते. एसीमुळे आल्हाददायक उन्हाळा जातो. काहींच्या घरी आधीपासूनच एसी लावलेला असतो. मात्र तो अधिक गारवा देत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. अशावेळी मेकॅनिकला बोलवण्याची आवश्यक नाही. काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घरातील एसी ठीक करू शकता आणि तो थंड का होत नाही हे जाणून घेऊ शकता. आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत.

    थर्मोस्टॅट सेटिंग्ज

    एसीच्या तापमानामध्ये जर सतत बदल केला तर थर्मोस्टॅटमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. तुमचा एसी कोणत्या तापमानाला चालेल हे थर्मोस्टॅट सेटिंग्ज ठरवतात. काही कारणास्तव एसी नीट थंड होत नसेल, तर त्याची थर्मोस्टॅट सेटिंग तपासा आणि तापमान तुमच्या गरजेनुसार सेट केले आहे की नाही ते ठरवा. यानंतर खोलीचे तापमान तपासा.

    कंडेनसर कॉइल्स

    एअर कंडिशनरच्या बाहेरील युनिट्समध्ये असलेल्या कंडेन्सर कॉइलमध्ये दोष होऊ शकतो. त्यामुळे एसी थंड होण्यामध्ये समस्या येऊ शकते. विशेषत: एसी बराच काळ बंद राहिल्यास आणि त्याची योग्य देखभाल केली नाही तर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच कंडेन्सर कॉइलमधील समस्या दूर केली तर, कूलिंग योग्यरित्या पूर्वरत सुरू होईल.

    एसी मोटर

    तुमच्या एअर कंडिशनरच्या अनेक समस्या थेट एसी मोटरशी संबंधित असू शकतात. एअर कंडिशनर युनिटमध्ये, मोटरसह, पंख्याचे फिरणे आणि वेग निश्चित केला जातो. अशा परिस्थितीत, नवीन हंगामात कूलिंग नसल्यास एसी मोटर दुरुस्त करून घ्यावी.

    कंप्रेसरमध्ये दोष

    कोणत्याही कूलिंग उपकरणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा कंप्रेसर. जर कॉम्प्रेसर व्यवस्थित काम करत नसेल तर कूलिंगमध्ये नक्कीच अडचण येते. कंप्रेसरमध्ये समस्या असल्यास, ते वेळेत दुरुस्त करावे लागेल, जेणेकरून कूलिंग सुरू होईल.