
झोप ही आशी गोष्ट आहे, हे एक जीवनातील वेगळ सुख असत आणि हे सुख सगळ्याना आवडत. झोप ही उत्तम आरोग्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. पण झोप जास्त घेणे हे तेवढच धोकादायक आहे. पण आज जाणून घेणार आहोत वयानुसार किती झोप घ्यावी याविषयी माहिती…
वयानुसार किती तासांची झोप घ्यावी?
- 6 ते 9 वयाच्या मुलांसाठी 9 ते 11 तासांचा झोप
- 12 ते 16 वयाच्या मुलांसाठी 8 ते 10 तासांची झोप
- 18 ते 64 वयाच्या व्यक्तींसाठी 7 ते 9 तास
- 65 वर्षांवरील वृद्धांसाठी 7 ते 8 तास झोप
हि काळजी घ्या
- साधारणत: रात्रीची झोप ही आरोग्यासाठी उत्तम असते. रात्री 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
- रात्री झोपण्यापूर्वी चहा आणि कॉफीचं सेवन चुकूनही करू नये. कॅफिनसारख्या उत्तेजक घटकामुळे तुमची झोप मोडू शकते.
- हेल्दी आहार घ्या. कमी खा आणि झोपण्यापूर्वी तीन चार तास आधी खा अन्यथा अपचनाचा त्रासामुळे तुमची झोप बिघडू शकते.
- शक्यतो रात्री व्यायाम करणे टाळावा. तुम्हाला निद्रानाशची समस्या निर्माण होऊ शकते. झोपण्याआधी तीन चार तास आधी तुम्ही व्यायाम करू शकता.