मनुके खाल्ल्याने शरीराला होतात हे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या सविस्तर

शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात सुख्या मेव्याचा समावेश केला पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. सुक्या मेव्यामध्ये मनुके सुद्धा येतात. त्यामुळे मनुके खाण्याचे देखील आरोग्यदायी फायदे आहेत.

  शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात सुख्या मेव्याचा समावेश केला पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. सुक्या मेव्यामध्ये मनुके सुद्धा येतात. त्यामुळे मनुके खाण्याचे देखील आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये विविध गुणधर्म आढळून येतात. ज्या व्यक्तींच्या शरीरात लोहाची कमतरता असेल अश्या व्यक्तींनी आहारात मनुक्यांचे सेवन केले पाहिजे. यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात. पोटाचा त्रास असलेल्या व्यक्तींना मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्हाला माहित का बाजरात कोण कोणत्या प्रकारचे मनुके मिळतात आणि त्याचे फायदे काय? चला तर जाणून घेऊया…

  काळे मनुका

  काळे मनुके हे विशेषतः सर्वच घरांमध्ये असतात. एखाद्या गोड पदार्थामध्ये या मनुक्यांचा वापर केला जातो. हे मनुके तुम्ही काळ्या रंगाच्या द्राक्षांपासून घरीच तयार करू शकता. मनुके सुकल्यानंतर त्याचा रंग काळा गडद होतो. काळे मनुके खाल्ल्याने केस गाळ्यांचा त्रास कमी होतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. हे मनुके आतडे स्वच्छ करतात. तसेच यामुळे त्वचा देखील निरोगी राहते.

  हिरवे मनुका

  हिरव्या रंगाचे मनुके हे पातळ असतात. तसेच यांचा आकार मोठा असतो. हिरव्या गडद रंगाचे हे मनुके चवीला देखील चविष्ट लागतात. यामध्ये भरपूर फायबर आणि पोषक तत्व आढळून येतात. तर यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ॲनिमियाला प्रतिबंध करण्याचे काम हिरवे मनुके करतात. रोजच्या आहारात हिरव्या मनुक्यांचे सेवन केल्याने पचनास फायदा होतो.

  लाल मनुका

  लाल मनुके हे चवीला चविष्ट असतात. हे मनुके लाला द्राक्षांपासून बनवले जातात. या मनुक्यांचा आकार मोठा असतो. ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास असेल अश्यानी लाल मनुके रोज खाल्ले पाहिजेत. यामुळे मधुमेह कमी होण्यास मदत होते. तसेच दातांच्या आरोग्यासाठी हे मनुके फायदेशीर ठरतात. दृष्टी सुधारते.

  सोनेरी मनुका

  सोनेरी मनुका या थॉम्पसन सीडलेस द्राक्षांपासून बनवल्या जातात. त्यामुळे यांना तुर्की हिरव्या द्राक्षांवरून सुलताना मनुका असे नाव पडले आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते. तसेच रक्तदाब कमी होतो. काळ्या रंगाच्या कोरिंथ द्राक्षांपासून तयार केलेला मनुका खाल्याने घसा खवखवणे बंद होते.मनुका म्हणजे सुकवलेली द्राक्ष. याचा वापर गोड पदार्थांमध्ये केलं जातो.