चेहऱ्यावर सनस्क्रीन लावताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर

उन्हाळ्यात घाईगडबडीमध्ये बाहेर जाताना आपण चेहऱ्यावर सनस्क्रीन लावल्या विसरतो. यामुळे चेहऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सुर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.

  उन्हाळ्यात घाईगडबडीमध्ये बाहेर जाताना आपण चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरतो. यामुळे चेहऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सुर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. यामुळे चेहरा सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्यांपासून वाचतो. उन्हाच्या किरणांमुळे चेहरा टॅनिंग आणि काळपट पडण्याची शक्यता असते. अश्यावेळी तुम्ही घरातून बाहेर जात असताना नेहमी सनस्क्रीन लावून बाहेर जावे. यामुळे चेहऱ्याचे होणारे नुकसान टळते. काही वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने सनस्क्रीन लावले पाहिजे. यामुळे त्वचेला हानी पोहचणार नाही.अनेकदा सनस्क्रीन लावल्यानंतर चेहरा चिकट होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकतो.

  मॉइश्चरायझर लावा

  चेहऱ्यावर सनस्क्रीन लावण्याआधी मॉइश्चरायझर लावा. सनस्क्रीन लावण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर लावून ५ मिनिट झाल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे. यामुळे उन्हाच्या झळांपासून रक्षण होते. चेहऱ्याला चिटकपणा जाणवत नाही. अनेकदा लोकांची त्वचा काळी पडते त्यामुळे सनस्क्रीन लावण्यापूर्वी मॉइश्चराइझर लावणे गरजेचे आहे.

  सनस्क्रीन जास्त लावू नये

  चेहऱ्याला जास्त वेळा सनस्क्रीन लावू नये. यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर पांढरे डाग आणि त्वचा चिकट होऊन जाते. त्यामुळे त्वचेवर योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावले पाहिजे. बाहेर जाण्याच्या १५ मिनिट आधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावा.

  १५ मिनिटे आधी सनस्क्रीन लावणे

  बाहेर जाण्यापूर्वी त्वचेला १५ मिनिट आधी सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतील. सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेला सनस्क्रीन शोषून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे बाहेर जाण्याच्या १५ मिनिटं आधी त्वचेला सनस्क्रीन लावावे. तसेच घरातून बाहेर जाण्याआधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.

  त्वचेवर अश्या प्रकारे सनस्क्रीन लावा

  चेहऱ्यावर सनस्क्रीन लावल्यानंतर ते जास्त चोळू नये. यामुळे त्वचेवर पांढरे डाग पडतात. जात तुम्ही कोणत्याही प्रकारची सनस्क्रीन लावली तरी ही समस्या तुम्हाला जाणवू शकते.१५ ते ३० एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरले पाहिजे. तसेच सनस्क्रीन लावताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.