राधा अष्टमी कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त!

जन्माष्टमीनंतर १५ दिवसांनी राधाअष्टमीचा उपवास होतो. हे व्रत केल्याने श्रीकृष्ण आणि राधा राणी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

    काही दिवसापुर्वी देशभरात गोकुळाष्टमी  साजरी करण्यात आली. आता कृष्णजन्माष्टमी प्रमाणे देशभरात राधाष्टमी (Radha Ashtami 2023)देखील साजरी करण्यात येणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला राधाअष्टमीचा सण साजरा केला जातो. हा दिवस श्रीकृष्णाची लाडकी राधा राणीची जयंती म्हणून साजरा केला जातो. मान्यतेनुसार राधा राणीचा जन्म श्रीकृष्णाच्या जन्मानंतर १५ दिवसांनी झाला होता. म्हणूनच हा दिवस राधा राणीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि राधा अष्टमी म्हणून ओळखला जातो. श्री कृष्णाची लाडकी राधा राणीच्या जयंतीनिमित्त त्यांचे भक्त या दिवशी त्यांच्यासाठी उपवास ठेवतात आणि त्यांची खऱ्या मनाने पूजा करतात.

    कधी आहे राधाअष्टमी?

    2023 मध्ये राधाअष्टमीचा उपवास शनिवार 23 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. या दिवशी लोक शुभ इच्छेसाठी उपवास करू शकतात आणि पूर्ण विधीपूर्वक व्रत पाळल्यास इच्छित परिणाम प्राप्त होतील आणि घरात आनंदाचा वास राहील. राधाअष्टमीचा दिवस हा श्रीकृष्ण आणि राधा राणीच्या भक्तांसाठी अतिशय खास दिवस आहे. या दिवशी लोक श्रीकृष्ण आणि राधा राणीच्या भक्तीत तल्लीन होऊन उपवास करतात.

    राधा अष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त

    राधाअष्टमीच्या दिवशी, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11:01 पासून सुरू होईल आणि 1:26 पर्यंत चालेल.
    अष्टमी तिथी 22 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1:35 पासून सुरू होईल आणि 23 सप्टेंबर रोजी रात्री 12:17 पर्यंत चालेल.
    या काळात तुम्ही श्री राधेतची पूजा करू शकता.

    या दिवशी पिवळ्या रंगाचे असतं महत्त्व

    या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. राधाजींना पिवळा रंग खूप आवडतो. या दिवशी उपवास किंवा उपासना करणाऱ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी पूजेसोबत पिवळे वस्त्र पसरून श्री राधे-कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. श्री राधेला पिवळ्या रंगाची फळे आणि फुले अर्पण करा. शक्य असल्यास, या दिवशी अर्पण केलेले अन्न देखील पिवळ्या रंगाचे