
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत (Changing Lifestyle) आरोग्याकडे म्हणावं तसं लक्ष अनेकजण देत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्धवताना दिसतात. तसेच ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचा मृत्यू झाल्याची बरीच उदाहरणं आहेत.
नवी दिल्ली : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत (Changing Lifestyle) आरोग्याकडे म्हणावं तसं लक्ष अनेकजण देत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्धवताना दिसतात. तसेच ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचा मृत्यू झाल्याची बरीच उदाहरणं आहेत. पण आता ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला याची माहिती समजेल, असे तंत्र वैद्यकीय तज्ज्ञांकडून विकसित केले जात आहे.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अनेकजण दगावले आहेत. मात्र, आता ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीमुळे हे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच त्याची माहिती मिळेल. यामुळे हजारो जीव वाचतील, असे सांगितले जात आहे.
कसे करते काम?
अमेरिकेतील कार्डिओलॉजिस्ट जेम्स मिन यांच्या प्रयत्नातून हे शक्य होत आहे. त्यांनी एक स्टार्टअप सुरू केला आहे. त्याचं नाव क्लिअरली असे आहे. या स्टार्टअपने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मूल्यमापन प्रणाली तयार केली आहे. हृदयाची तपासणी करण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राफी आवश्यक असते. हृदयरोग किंवा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टर या प्रक्रियेचा वापर करतात.
कशी आहे यंत्रणा?
रक्तवाहिन्यांवरील चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर घटकांच्या साठ्याला प्लेक म्हणतात. धमन्यांमध्ये प्लेक जमा झाल्यास भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दाट असते. या प्रणालीच्या मदतीने हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणेही ओळखता येतात. यानंतर, डॉक्टर किंवा तज्ञ रुग्णाच्या उपचाराची पद्धत त्यानुसार नियोजित करू शकतात.